बालाजी शिंदे, पुणे शहर प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन पुणे:- शहरातून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. येते रूम करून भाड्याने राहणाऱ्या तरुणाने घरमालकाच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याच्या घटनेने पुणे शहर हादरलं आहे.
घर मालकाच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार प्रकरणी समर्थ पोलिसांनी रूम करून भाड्याने राहणाऱ्या नराधम तरुणासह त्याच्या पत्नीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. सिजू समीर शेख वय 26 वर्ष व त्याची पत्नी सोफियाना शेख वय 25 वर्ष असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
याबाबत या अल्पवयीन मुलीने समर्थ पोलीस स्टेशन येते तक्रार दिली आहे की, आरोपी सिजू समीर शेख व सोफियाना शेख या पती पत्नी ने पीडित मुलीच्या इमारतीत भाड्याने रूम घेऊन राहत होते. आरोपी सिजू शेखने अल्पवयीन मुलीशी ओळख केली. त्यानंतर तिच्यावर वेळोवेळी अत्याचार केले. यावेळी मुलीच्या वडिलांना शेखने धमकावले. तसेच मुलीची छायाचित्रे त्याने समाजमाध्यमात प्रसारित करण्याची आणि मुलीला पळवून नेण्याची धमकी त्याने दिली. याबाबत मुलीच्या वडिलांनी पोलिसांकडे नुकतीच तक्रार दिली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक सूरज बंडगर हे पुढील तपास करत आहे.