श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन बीड:- एमपीएससी परिक्षेत राज्यात प्रथम आलेल्या रविवारी नरेंद्र जोशीचा सकल ब्राह्मण समाजा कडून कौतुक सोहळा परळी वैजनाथ येथे आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमास उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात आले आहे.
ब्राह्मण बहुद्देशीय सभेचे विश्वस्थ वे.शा.सं. मनोहर जोशी यांचे चिरंजीव नरेंद्र मनोहर जोशी यांनी महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या (MPSC) वतीने घेण्यात येणाऱ्या विक्री कर निरीक्षकांच्या (STI) परीक्षेत महाराष्ट्र राज्यात प्रथम येण्याचा तसेच दुय्यम निबंधक मुद्रांक निरीक्षक परीक्षेत महाराष्ट्र राज्यात द्वितीय येण्याचा बहुमान पटकावला आहे.यादैदिप्यमान यशाबद्दल सकल ब्राह्मण समाजाकडून रविवार दि. २४ डिसेंबर सकाळी ११:०० वाजता स्व.मनोहरपंत बडवे सभागृह विठ्ठल रुक्मिणी मंदिर, देशपांडे गल्ली परळी वैजनाथ येथे चि.नरेंद्र मनोहर जोशी यांचा ‘कौतुक सोहळा’ आयोजित करण्यात आला आहे.
या कार्यक्रमास सकल ब्रह्मवृंद, आप्तेष्ट, स्नेही यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन संयोजकांकडून करण्यात आले आहे.