उषाताई कांबळे, सांगली शहर प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सांगली:- शहरातून एक खळबळजनक घटना समोर आली होती. 13 नोव्हेंबर रोजी येथील काळ्या खणीजवळ एकाला चाकुचा धाक दाखवून लुटण्यात आले होते. या घटनेच्या पोलिसांनी पर्दाफास करत विकी राजू मोळके वय 25 वर्ष, रा. माकडवाले गल्ली, सांगली, गणेश हणमंत पवार वय 20 वर्ष, रा. अच्युतराव कुलकर्णी प्लॉट, सांगली यांना विश्रामबाग पोलिसांनी जेरबंद केले. तिसरा संशयित विष्णू मुळके याचा शोध पोलिस घेत आहेत. अटक केलेल्या संशयितांकडून 65 हजार रुपये किंमतीचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.
प्राप्त माहितीनुसार, अमित बबन माळी वय 35 वर्ष, रा. जुना बुधगाव रस्ता, बिरोबा मंदिर शेजारी, सांगली यांना चाकूचा धाक दाखवून 75 हजारांना लुटल्याची घटना 13 नोव्हेंबर रोजी घडली होती. याप्रकरणी विश्रामबाग पोलिसांत तिघा अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल झाला होता. माळी हे लघुशंकेसाठी थांबले असता तिघा संशयितांनी चाकूचा धाक दाखवून त्यांच्या गळ्यातील सोनसाखळी व खिशातील 10 हजारांची रोकड काढून घेतली होती.
यावेळी आरोपींनी लुटलेली सोनसाखळी सांगलीत शिलंगण चौकात विक्रीसाठी सोमवारी दि. 25 रोजी आले होते, तेव्हा पोलिसांनी त्यांच्या मुसक्या आवळल्या. पोलिस निरिक्षक संजय मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरिक्षक अफरोज पठाण, अनिल ऐनापुरे, संदीप साळुंखे, संदीप घस्ते, महंमद मुलाणी, आर्यन देशिंगकर, संकेत कानडे, प्रशांत माळी, शिवाजी ठोकळ, गजानन चव्हाण यांनी ही कारवाई केली.