संतोष मेश्राम, राजुरा प्रतिनिधी मोबा.न.9923497800
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन चिमूर:- राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकारयांची चिमूर येथिल जिल्हा परिषद बांधकाम विभाग विश्रम गृहात बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत चिमुर तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निहाय पदाधिकाऱ्यांच्या नियुक्ती करुन गाव तेथे शाखा स्थापन करुन पक्ष वाढी संदर्भात पदाधिकारी तसेच कार्यकर्त्यांसोबत चर्चा करण्यात आली. यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शरद पवार गटाचे चिमुर तालुकाध्यक्ष मनीष वजरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रिय अध्यक्ष अजितदादा पवार यांच्या भूमिकेचे समर्थन करीत प्रमुख पदाधिकाऱ्यांसह प्रवेश केला.
सदर बैठक जिल्हा अध्यक्ष नितीन भटारकर, राष्ट्रवादी काँग्रेस चिमुर विधानसभा अध्यक्ष अरविंद रेवतकर, चिमूर तालुका अध्यक्ष योगेश ठुने यांच्या नेतृत्वाखाली बैठक संपन्न झाली. सदर बैठकीत राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुका अध्यक्ष मनीष वजरे, स्वरूप तळवेकर, परमेश्वर ढोणे, मेहबूब भाई शेख, दिपक दुधे, राष्ट्रपाल गेडाम, बाबाकर खोब्रागडे, राजेंद्र मसराम, संजय घरत, राहुल ढोणे, सुखदेव गराटे उपस्थित होते.