प्रविण जगताप, वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी
मोबा. 9284981757
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा:- आज दिनांक 2/1/24. रोजी चालक-मालक भीम आर्मी वाहन तसेच विविध संघटना द्वारे मीटिंग घेण्यात आली व शासनाने वाहन चालक- मालक विरुद्ध हिट अँड रन हा नवीन कायदा अमलात आणून चालक विरुद्ध कठोर कानून बनून त्यांच्या जीवनाचे केले हनन कोणताही गाडी चालक जाणीवपूर्ण कोणाला उडवण्याच्या उद्देशाने गाडी चालवत नसतो परंतु अमित शहाद्वारे हा नवीन कायदा आणून चालक यांचा विचार न करता एकतर्फा हुकूमशाहीने लादला गेलेला कायदा आहे यासाठी संपूर्ण भारतामध्ये तसेच राज्यांमध्ये विविध स्तरावर आंदोलन होत आहे सर्व चालक असोसिएशन युनियन संघटना तर्फे कायदाविरुद्ध संतप्त होऊन तीव्र विरोध दर्शवीत आहे याकरिता परिवहन मंत्री केंद्र व राज्य राज्यमंत्री कृष्णाजी पाल तसेच केंद्र मंत्री नितीन गडकरी यांनी यावर दखल घेऊन गरीब चालक मालक त्यांच्यासाठी कायद्याची पुनवृत्ती करून सर्वांना समान पाहून कायदा रद्द करण्यात यावा हे संपूर्ण देशभरातील चालक-मालक यांची मागणी आहे.
जे आपल्या दैनंदिन जीवनात गाडी चालवून आपल्या कुटुंबाची देखभाल करत असतात ते एवढा पैसा आणणार तरी कुठून आणि शासनाने घोषित केल्याप्रमाणे दहा वर्षाची शिक्षा आणि सात लाख रुपये भूदंड ठोकण्यात आला आहे पण सेक्शन 304 अ नुसार यामध्ये काय फेरबदल करण्यात आला हे शासनाने जाहीर प्रसिद्धी करायला हवा जेणेकरून अफवा द्वारे कायदा सुव्यवस्था बिघडणार नाही पण असं न करता औपचारिक विद्या फक्त घोषणा करण्यात आले त्याचे परिणाम राज्य ते संपूर्ण देशभरात दिसून येत आहे याकरिता शासनाने गंभीररित्या यावर विचार विनिमय करून कायदा रद्द करण्यात यावे भीम आर्मी द्वारा संविधानिक मार्गाने उद्या आंदोलन करण्यात येणार याची शासनाने दक्षता घ्यावी अशी माहिती यावेळी महाराष्ट्र संदेश न्युजला दिली.

