प्रविण जगताप, वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी
मोबा. 9284981757
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वडनेर:- ग्राम पंचायतच्या वतीने महिला सभागृह बांधकामाचे भूमिपूजन व सावित्रीबाई फुले यांची जयंती कार्यक्रमात महिलांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती 3 जानेवारीला वडनेर ग्रामपंचायत च्या वतीने महिला सभा व बांधकामाचे भूमिपूजन व सावित्रीबाई फुले जयंती उत्साह साजरी करण्यात आली.
वडनेर येथील सरपंच सौ. कविताताई विनोद वानखेडे यांनी महिलांकरिता सभागृह बांधकाम व सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्याच्या कार्यक्रमाचे आयोजन ग्रामपंचायत वडनेर येथे करण्याचे ठरविले होते मागील अनेक दिवसांपासून महिलांची मागणी होती की महिलांना एक स्वतंत्र महिला सभागृह असावे महिलांची असलेली मागणी सरपंच सौ कविता विनोद वानखेडे यांनी समजून घेऊन शासन स्तरावर प्रस्तावित केली व वारंवार पाठपुरावा करून वडनेर येथे महिलां करिता सभागृह बांधकाम 18 लक्ष 93 हजार रुपये निधी मंजूरी प्राप्त करून घेतली.
स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीच्या शुभमुहूर्तावर महिला सभागृह बांधकामाचे भूमिपूजन वडनेर येथील हजारो महिलांच्या उपस्थितीत संपन्न झाले कार्यक्रमाला उपस्थित सौ सातपुते मॅडम निमू घटवाई विद्यालय वडनेर सौ. सारिका गमे साईबाबा महाविद्यालय वडनेर सौ. उरकांदे, हिंगणेकर, विकास विद्यालय वडनेर दौड मॅडम, ढवळे मॅडम, इंदिरा गांधी महाविद्यालय वडनेर यांच्या प्रमुख मार्गदर्शनात कार्यक्रम घेण्यात आला.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष सौं सातपुते मॅडम तर प्रमुख अतिथी सारिका गमे मॅडम होत्या. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक भाषण आयोजक सरपंच सहकविताताई वानखेडे यांनी केले त्यांनी गावातील उपस्थित महिलांना अतिशय सुंदर मार्गदर्शन केले की घरातील एक महिला शिक्षित असली तर संपूर्ण कुटुंब शिक्षित होते तसेच गाव सुद्धा शिक्षित होऊन साक्षर होऊन कुटुंबाची सोबतच गावाची प्रगती सुद्धा आपण महिलाच करू शकतो तसेच क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्याच मुळे आपण महिला प्रगती करू शकलो हे विचार महिलांना मार्गदर्शन केले व महिलांचे आरोग्य चांगले राहावे याकरिता पिण्याच्या पाण्याचा उपयोग शुद्ध करावा याकरिता गावात एकूण पाच ठिकाणी पिण्याचे शुद्ध व थंड पाणी केंद्र डॉक्टर बाबासाहेब पुतळा परिसर बाजार चौक मलंगनाथ बाबा परिसर हनुमान मंदिर परिसर सापळे लेआउट याप्रमाणे केंद्र सुरू करून पिण्याचे पाणी पिण्याकरिता पाण्याची कॅन कुटुंबाला एक वितरण करण्याचा मानस व्यक्त करून पंधरा दिवसात पूर्ण करण्याची हमी सुद्धा उपस्थित महिलांना दिली.
या कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता नवी दिशा प्रभाग वडनेर संघटिका अर्चना शेंद्रे वडनेर संघाच्या प्रेरिका सौं विद्या घोडमारे, सौ नीता ढेगरे, सौ संगीता डोफे, कुमारी पूजा जोगे, सौं वर्षाताई भोयर, सौ. प्रियंका वाटमोडे यांनी गावात जनजागृती करून कार्यक्रम यशस्वी केला कार्यक्रमाला विशेष उपस्थिती विनोद वानखेडे माजी सरपंच ग्रामपंचायत वडनेर सुभाष शिंदे उपसरपंच ग्रामपंचायत वडनेर अनिल येळणे अरिपभाऊ शेख ग्रामपंचायत सदस्य ग्रामविकास अधिकारी श्री रामटेके श्री कातोरे, शाखा अभियंता पंचायत समिती हिंगणघाट हरिभाऊ तागडे कॉन्ट्रॅक्टदार सभागृह बांधकाम तसेच मोठ्या प्रमाणात महिला उपस्थित होत्या.