हानिशा दुधे, चंद्रपूर जिल्हा ग्रामीण प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज! ऑनलाईन बल्लारपूर:- जनता हायस्कूल डेपो शाखा बल्लारपूर या शाळेत दिनांक 1 जानेवारी 2024 रोजी नवीन वर्ष साजरे करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बी.बी. भगत मुख्याध्यापक तर प्रमुख पाहुणे एम. डी. टोंगे माजी मुख्याध्यापक तसेच मान. यु. के. रांगणकर सर विज्ञान शिक्षक यांची मंचावर उपस्थिती होती.
नवीन वर्षाच्या आगमना प्रसंगी शाळेच्या वतीने केक कापण्यात आला. शाळेचे मुख्याध्यापक बी. बी. भगत, प्रमुख पाहुणे एम. डी. टोंगे, यु. के. रांगणकर सर यांनी नवीन वर्षानिमित्त मार्गदर्शन करून शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाच्या शेवटी विद्यार्थ्यांना अल्पोपहार देण्यात आला.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक आर. के. वानखेडे, संचालन व आभार प्रदर्शन एस. एन. लोधे मॅडम यांनी केले. या कार्यक्रमात शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी गणेश चंदावर (बाबू), जगदीश कांबळे, वामन बोबडे, इंद्रभान अडबाले वर्षा ठाकरे सहित विद्यार्थी गण उपस्थित होते.