आशीष अंबादे, वर्धा जिला प्रतिनिधि
मो. 8888630841
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा:- येथून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. येथील एका महिला पोलीस शिपायाची स्थानिक गजानन नगरात राहणाऱ्या शुभांगी देशमुख सोबत ओळख होती. ती ड्यूटीवर असताना तिला शुभांगी हिने फोन करीत घरी बोलावले. घरी येताच दार बंद करीत कर्मचाऱ्याचा हातातील ब्रेसलेट, अंगठ्या काढून घेतल्या. परत तीन महिला आल्या. चौघींनी मिळून परत शिपयाचा विनयभंग करीत मारहाण सुरू केली. त्या दरम्यान एकीने महिला शिपायाच्या मानलेल्या भावास फोन करून बोलावले. त्यालाही मारहाण केल्यानंतर त्याला त्याच्या प्रेयसीला फोन करण्यास दरडावले. एव्हढेच नव्हे तर प्रेयसीला तुझ्या प्रॉपर्टीवर प्रेम करतो, तुझ्यावर नाही असे बोलण्यास भाग पाडले. यानंतर प्रेयसी येताच तिला धमकी देत पोलीस शिपाई तसेच तिच्या भावास मारहाण करण्यास लावली. हा सर्व प्रकार सदर पीडित शिपायाने रामनगर पोलीस ठाण्यात जाऊन नमूद केला.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेत पोलिसांनी शुभांगी देशमुख, पल्लवी राऊत, प्रीती महेश राऊत, शारदा राऊत, वैशाली टिपले, आविष्कार देशमुख, शैलेश राऊत, महेश राऊत यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. विशेष म्हणजे या घटनेत एक बाब आहे. या घटनेवेळी पोलीस शिपाई तिच्या मानलेल्या भावाच्या नावाने आधीच लिहून ठेवलेला मुद्रांक आणला. त्यावर स्वाक्षरी करण्यास भाग पाडले. याची वाच्यता केल्यास जिवे मारण्याची धमकी पण दिली. त्यानंतर सोडून देण्यात आले.
शिपाई व तिच्या भावास मारहाण करीत असताना काही महिलांनी मारहाणीचा व्हिडिओ काढला आहे. मारहाण कशाला करीत आहे, हे वारंवार विचारत असूनही कोणीच काही सांगत नव्हते. आरोपींनी शिपाई व तिच्या भावाच्या मोबाईल मधील डेटा पण डिलिट करून टाकला. या प्रकरणाची चांगलीच चर्चा सुरू झाली आहे. प्रकरण चौकशीत असून अद्याप कुणालाही अटक झाली नसल्याचे रामनगर पोलीसांनी सांगितले.