शाळा व्यवस्थापक समितीचे अध्यक्ष अरविंद परकीवार तर उपाध्यक्ष मनोज सिडाम
मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन अहेरी:- पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या राजाराम येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक केंद्र शाळेत व्यवस्थापक समितीचे निवळ करण्यात आले आहे. या वेळी शाळेतील केंद्र प्रमुख पुसलवार मुख्याध्यापक तथा शाळा व्यवस्थापक समितीचे सचिव अजय पस्पूनुवार सर, शिक्षिका मोतकूवार मॅडम, जुमनाके सर, मडावी सर, चुधरी सर उपस्थित होते, तर शाळा व्यवस्थापक समीतीचे सदस्य म्हणून, जितेंद्र पंजलवार,ममता सिडाम, मीना सडमेक, जितेंद्र गड्डमवार यांची निवळ करण्यात आले होते.
पुढे बोलताना शाळा व्यवस्थापक समितीचे अध्यक्ष अरविंद परकीवार म्हणाले की, शाळेतील कुठलीही समस्या बद्दत मी नेहमी तत्पर राहीन. आणि शाळेतील समस्या आपण शिक्षकवर्ग व पालकवर्ग, हातभार लावू. असे भाषनात म्हणाले. या वेळी शाळेतील पालकवर्ग केवल गड्डमवार, नितीन मोतकुवार, संजय लग्गावार, साईनाथ दुर्गे, तिरुपती दुर्गे, महेश मडावी, देवाजी आत्राम, मनोज मडावी, दिवाकर आत्राम, नरेंद्र शालिग्राम, राहिदास सोयाम, विठ्ठल बामनकर, संतोष बामनकर, व्यंकटेश नैताम, प्रकाश मडावी, योगेश आलाम, सुधीर बोडगेलवार, महेश कुसराम, सदाशिव वेलादी, किरण सडमेक इत्यादी पालकवर्ग उपस्थित होते.