जळगाव जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन जळगाव:- जळगाव जिल्ह्यातून एक संतापजनक घटना समोर आली आहे. चोपडा तालुक्यातील एका गावातील 18 वर्षीय युवतीवर प्रथम एका नराधमाने बलात्कार केला त्यानंतर तिघां नराधमांनी मिळून सामूहिक बलात्कार केल्याची घटना घडली. ही घटना समोर येताच संपूर्ण जळगाव जिल्हा हादरला आहे. या प्रकरणी संशयित चार नराधमांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहे.
तालुक्यातील एका गावात गफूर गबू तडवी वय 33 वर्ष याने 2 जानेवारीला दुपारच्या सुमारास पिढीत तरुणीच्या घरात घुसून धमकी देत तिच्यावर बलात्कार केला. एवढेच नाही, तर या तरुणीला यावल तालुक्यात भेटायला ये; नाही तर, ठार मारण्याची धमकी दिली. घाबरून ही तरुणी यावल येथे पोहोचली. त्यावेळी बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी प्रतीक राजेंद्र कोळी वय 20 वर्ष, पंकज बुधा कुंभार वय 26 वर्ष व अमोल शत्रुघ्न कोळी वय 23 वर्ष या तीघा नराधमांनी दारूच्या नशेत तरुणीला आधी सहानुभूती दाखवली. नंतर जिवे मारण्याची धमकी देत आळीपाळीने बलात्कार केला. 4 जानेवारी रोजी रात्री 12 ते पहाटे तीन वाजेदरम्यान ही घटना घडली.
या प्रकारानंतर युवतीने दिलेल्या फिर्यादीवरून वरील 4 ही नराधम आरोपी विरुद्ध अडावद पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून, पुढील तपास पोलीस करीत आहेत.
आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 9766445348 / 7385445348