वैशाली गायकवाड, उपसंपादक पुणे
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन पुणे:- जिल्हातून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. येथे मुलगा होत नाही म्हणून विवाहितेचा सासरच्या मंडळींनी छळ केला हा छळ असह्य झाल्याने या विवाहितेने गळफास लावून आत्महत्या केल्याने संपूर्ण पुणे जिल्हा हादरला आहे.
सतत विवाहितेला 4 मुली झाल्या परंतु मुलगा होत नसल्याने सासरच्या मंडळींनी विवाहितेला मानसिक व शारीरिक मोठ्या प्रमाणात छळ केला. या छळाला कंटाळून 36 वर्षीय महिलेने आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपविली.
महिलेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी चाकण पोलिसांनी पती, सासु – सासरे यांच्यावर गुन्हा दाखल करुन पतीला अटक केली आहे. ही घटना मंगळवार दि.2 दुपारी एकच्या सुमारास खंडोबा माळ चाकण येथील गुप्ता चाळीत घडली आहे.
याप्रकरणी मृतक विवाहितेच्या भावाने शाम मोहन लंचु गुप्ता वय 28 वर्ष रा. मु.पो. भिती चौक भिटी ता.जि. मऊ उत्तर प्रदेश याने चाकण पोलीस स्टेशन मध्ये फिर्याद दिली आहे. यावरुन आत्महत्या केलेल्या महिलेच्या पती सचिन सुभाष गुप्ता, सासरे सुभाष देवनारायण गुप्ता, सासु रा. खंडोबामाळ, गुप्ता चाळ, चाकण यांच्यावर आयपीसी 306, 498 (अ), 323, 504, 34 नुसार गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची बहीण हिला आरोपींनी माहेरून पैसे आणण्या साठी त्रास दिला. त्यानंतर चार मुली झाल्या पण मुलगा झाला नाही या कारणावरून तिचा सतत शारीरिक व मानसिक छळ सुरू केला. सासरच्या मंडळींच्या सततच्या जाचाला कंटाळून विवाहितेने राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केली. चाकण पोलिसांनी तिघांवर गुन्हा दाखल करुन आरोपी पतीला अटक केली आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.
आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 9766445348 / 7385445348