मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन अहेरी:- तालुक्यातील नंदिगांव येथील उपसरपंच हरीश गावडे व गावातील नागरिक यांनी आलापल्ली ते सिरोंचा राष्टीय महामार्ग अत्यन्त दयनीय अवस्था असून या राष्टीय महामार्ग मोठं-मोठे खड्डे पडून आतापर्यंत अनेकांचे अपघात होऊन जीव गमावावे लागले आहेत. अनेकांचे कुटुंबाचे जीवन उध्वस्त झालेले आहेत. लहान, लहान मुले पोरके झालेले आहे. मात्र शासन व प्रशासन जाणूनबुजून दुर्लक्ष करीत आहे. या बद्दल अनेकांनी विविध संघटने मार्फत निवेदन, चक्का जाम, उपोषण करीत आहेत. परंतु आज तागायत रस्ता दुरुस्ती केललं नाही.
रस्त्यावर पडलेल्या या भोकडाळ खड्ड्यामुळे आणखी किती जणांचे प्राण जाईल या कडे शासनाचे लक्ष असावे. असे म्हणण्यात काहीही हरकत नाही. असे नंदिगांवचे उपसरपंच हरीश गावडे, नागरिक संदीप दुर्गे, प्रकाश मडावी, राजू सिडाम, बिचू कोरेत, स्वप्नील तोर्रेम, अरविंद सोयाम, अजित सोयाम, आकाश तोर्रेम. इत्यादी नागरिकांनी तात्काळ राष्टीय महामार्ग दुरुस्ती करण्यात यावे. अशी मागणी पत्रकातून उपसरपंच हरीश गावडे यांनी केली आहे.

