Wednesday, March 4, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home देश विदेश

लोकसभेसाठी काँग्रेसचा डाव साधणार; वरुन आदेश आले, पटोले कामाला लागले; महाविकास आघाडीचे काय होणार?

मनवेल शेळके by मनवेल शेळके
January 7, 2024
in देश विदेश, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, मुंबई, राजकीय
0 0
0
लोकसभेसाठी काँग्रेसचा डाव साधणार; वरुन आदेश आले, पटोले कामाला लागले; महाविकास आघाडीचे काय होणार?
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

राज शिर्के, मुंबई शहर प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन मुंबई: लोकसभा निवडणुकीसाठी इंडिया आघाडीनं डिसेंबरच्या अखेरपर्यंत जागावाटपाची डेडलाईन निश्चित केली होती. पण अद्याप तरी एकाही राज्यातील जागावाटपाचा फॉर्म्युला निश्चित झालेला नाही. महाराष्ट्रात लोकसभेच्या ४८ जागा आहेत. एबीपी सी व्होटरच्या सर्वेक्षणानुसार राज्यात महाविकास आघाडीला २६ ते २८ जागा मिळण्याचा अंदाज आहे. तर सत्ताधारी महायुतीला १९ ते २१ जागा मिळू शकतात. त्यामुळे महाविकास आघाडीचं पारडं जड असताना काँग्रेस मोठा डाव टाकण्याच्या तयारीत असल्याचं दिसतंय.

काँग्रेसनं राज्यातील सर्वच्या सर्व ४८ जागांसाठी तयारी सुरू केली आहे. जागावाटपाचा विषय चर्चेत असताना, उद्धव ठाकरे गटानं २३ जागांची मागणी केलेली असताना, वंचित बहुजन विकास आघाडी १२ जागांसाठी आग्रही असताना काँग्रेसनं ४८ जागांवरील इच्छुकांची नावं मागवली आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीतील अन्य घटक पक्षांमध्ये चलबिचल सुरू झाली आहे. लोकसभा निवडणूक इच्छिणाऱ्या नेत्यांनी आपापली नावं द्यावीत, असं काँग्रेसकडून सांगण्यात आलं आहे.

महाविकास आघाडीतील पक्षांचं जागावाटप अंतिम टप्प्यात असल्याची माहिती शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी दिली. प्रकाश आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीसोबतही चर्चा सुरू असल्याचं ते म्हणाले. महाविकास आघाडीतील पक्षांमध्ये कोणतंही मतभेद नाहीत. काँग्रेस आणि राष्ट्रवादीला वंचितबद्दल कोणताही आक्षेप नाही, असंही राऊत यांनी सांगितलं

सुत्रांच्या हवाल्यानं दिलेल्या वृत्तानुसार, महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि वरिष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी ३ जानेवारीला नवी दिल्लीत पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि खासदार राहुल गांधींची भेट घेतली. यानंतर पटोलेंनी राज्यातील सर्व शहर आणि जिल्हा अध्यक्षांना इच्छुक उमेदवारांची नावं पाठवण्याच्या सूचना केल्या. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढवणार का अशी चर्चा सुरू झाली.

काँग्रेसनं ४८ जागांसाठी इच्छुकांची नावं मागवणं दबावतंत्राचा भाग असू शकतो. ठाकरेंची शिवसेना २३ जागांसाठी आग्रही आहे. तर वंचितच्या आंबेडकरांनी १२ जागांची मागणी केली आहे. त्यामुळे मित्रपक्षांवर दबाव आणण्यासाठी काँग्रेसनं ४८ जागांसाठी उमेदवारांची नावं मागवलेली असू शकतात. शिवसेना २३ जागा लढवणार असेल तर मग आम्ही काय करायचं, असा सवाल काही दिवसांपूर्वीच काँग्रेसचे माजी खासदार संजय निरुपम यांनी विचारला होता.

२०१९ ची लोकसभा निवडणूक शिवसेना, भाजप युतीनं लढवली. त्यांच्यासमोर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसचं आव्हान होतं. ठाकरेंच्या नेतृत्त्वाखाली शिवसेनेनं १८ जागा जिंकल्या होत्या. तर राष्ट्रवादीनं ४ आणि काँग्रेसनं १ जागा जिंकली होती. काँग्रेसचे एकमेव खासदार बाळू धानोरकर यांचं गेल्या वर्षी निधन झालं. त्यामुळे सध्या राज्यात काँग्रेसची पाटी कोरी आहे. तर पक्षफुटीमुळे शिवसेना, राष्ट्रवादीची ताकद कमी झाली आहे.

Previous Post

आमच्याशी वैर आहे तर मैदानात येऊन लढा, विकास कामात खोडा कशाला घालता: आ संदिप क्षीरसागर यांनी खडसावले.

Next Post

चिंतलपेठ येथे वाघाच्या हल्ल्यात महिला जागीच ठार, परिसरात पसरली दहशत.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
चिंतलपेठ येथे वाघाच्या हल्ल्यात महिला जागीच ठार, परिसरात पसरली दहशत.

चिंतलपेठ येथे वाघाच्या हल्ल्यात महिला जागीच ठार, परिसरात पसरली दहशत.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In