श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन बीड:- येथून एक दुःखद घटना समोर आली आहे. येथे पतंग काढत असतांना गॅलरीतून खाली पडल्याने एका 9 वर्षीय चिमुकल्याचा दुर्देवी मृत्यु झाल्याची घटना शनिवारी सायंकाळच्या सूमारास शहरातील पांगरी रोड परिसरात घडली. कृष्णा दिलीप तकीक असे मृतक मुलाचे नाव आहे. यामुळे संपूर्ण गावात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
कृष्णा दिलीप तकीक हा मुलगा काल संध्याकाळच्या सुमारास आपल्या घराच्या गच्चीवर पतंग उडवत होता. त्याचा पतंग आडकल्याने तो काढण्याचा प्रयत्न करत होता. मात्र् पतंग काढत असतांना तोल जावून तो गॅलरीतून खाली पडला. यामध्ये त्याला गंभीर मार लागल्याने त्याचा मृत्यू झाला. दरम्यान मृत मुलावर रात्री उमरद जहॉगिर येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेने उमरद जहॉगिर व खापर पांगरी येथे हळहळ व्यक्त केली जात आहे

