अनिल अडकिने सावनेर तालुका प्रतिनिधी
मो. नं. ९८२२७२४१३६
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सावनेर:- आगामी होऊ घातलेल्या निवडणुकी साठी भारतीय जनता पक्षाच्या वतीने संघटनात्मक पातळीवर जोरदार मोर्चे बांधणी सुरू केली आहे. त्याचमुळे भारतीय जनता पार्टी सावनेर शहराची नवीन विस्तारित कार्यकारिणी घोषित करण्यात आली तसेच सर्व आघाडींच्या अध्यक्षांची निवड करण्यात आली.
सावनेर येथे 7 जानेवारी रविवारला जनता सेलिब्रेशन लॉन सावनेर येथे जिल्हाध्यक्ष सुधाकर कोहळे, डॉ.राजीव पोतदार, अरविंद गजभिये, रामराव मोवाडे, अशोक धोटे, प्रकाश टेकाडे , रोहित मुसळे, डॉ. विजय धोटे, विजय देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत व भाजप सावनेर शहर अध्यक्ष राजूभाऊ घुगल यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पार पडली.
या कार्यकारणीमध्ये अध्यक्षस्थानी भिमराव (राजू) घुगल यांची निवड करण्यात आली. तसेच महामंत्री म्हणून आशिष मानकर, नरेंद्र ठाकूर, उपाध्यक्ष पदी शालीक मोहतुरे, मनीषा मनीष खंगारे, नरेंद्र दुबे, प्रमोद पारधी, वसंता सय्याम, महेश चकोले, कोषाध्यक्ष पदी रत्नाकर ठाकरे, सचिवपदी राधेश्याम उलमाले, राजू कछवाह, सौ.पिंकी आशिष लोखंडे, प्रकाश गोलाईत, कार्यालय मंत्री सुजल साबळे, प्रसिद्धी प्रमुख पदी अंकित भोपे,
ओबीसी मोर्चा अध्यक्ष पदी बापुराव सुरे, महिला आघाडी अध्यक्ष वैशाली कोहळे, युवा मोर्चा अध्यक्ष पदी पिंटू सातपुते, अनुसूचित जाती एससी अध्यक्षपदी स्वप्निल पारवे, अनुसूचित जमाती एसटी अध्यक्षपदी राजेश धुर्वे, सोशल मीडिया अध्यक्ष पदी प्रज्वल कांबळे व प्रकाश दुबे यांची निवड करण्यात आली.
या सर्वांच्या निवड झाल्याबद्दल रविंद्र ठाकूर, आशिष माटे, अरविंद ताजने, सोनू नवदिंगे, तुषार उमाटे, दिवाकर नारेकर, नरेंद्र ठाकूर, शालिक मोहतुरे, राधेश्याम उलमाले, मोहन कानफाडे, बापू सुरे, सचिन उईके, रत्नाकर ठाकरे, मोहन वानखेडे, पिंटू सातपुते, रतन खंगारे, मनीष खंगारे, प्रज्वल कांबळे, अभिषेक सातपुते, सतीश बनकर, अंकित भोपे, प्रमोद पारधी, सुभाष राऊत, स्वप्निल पारवे, अमित झुडापे व इतर कार्यकर्ते पदाधिकारी यांनी शुभेच्छा दिल्या.

