शेवगावचे कर्तव्यदक्ष तहसीलदार यांनी मागणी केली तात्काळ मान्य.
रवींद्र भदर्गे, प्रतिनीधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन शेवगाव :-सोमवार दि 8 जानेवारी 2024 रोजी शेवगाव चे तहसीलदार प्रशांत सांगडे यांना वंचित बहुजन आघाडीचे राज्य उपाध्यक्ष प्रा. किसनराव चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली वंचित बहुजन आघाडीचे शिष्ठमंडळ समक्ष भेटून तहसील कार्यालयात चोरीची जप्त केलेल्या वाळूचा मोठा साठा झाला असून त्याची विल्हेवाट लावण्यासाठी शेवगाव शहर व तालुक्यात प्रधानमंत्री आवास योजना, रमाई आवास योजना व शबरी आवास घरकुल योजनेमध्ये घरकुल मंजूर झालेले असून वाळू अभावी लाभार्थ्यांना काम करणे अवघड झाले आहे त्यांनाही बांधकामासाठी चोरून वाळू चढ्या भावाने घ्यावी लागते त्यामुळे आपल्या कार्यालयातील जप्त केलेल्या या वाळूची घरकुल धारक लाभार्थ्यांना मोफत देऊन विल्हेवाट लावावी म्हणजे तहसील कार्यालयातील साठाही कमी होईल व घरकुल धारकांना घरकुलांचे कामही तात्काळ होतील अशी मागणी केली.
त्यानंतर तहसीलदार प्रशांत सांगडे यांनीही वंचित बहुजन आघाडीच्या शिष्टमंडळाने केलेल्या मागणीला क्षणाचाही विलंब न लावता तात्काळ मान्यता देऊन घरकुल धारकांनी गटविकास अधिकाऱ्यांचे घरकुल कार्यारंभाचे पत्र घेऊन यावे त्यांना एका घरकुल साठी पाच ब्रास मोफत वाळू दिली जाईल फक्त वाहतुकीचा खर्च संबंधित घरकुल धारकाला करावा लागेल असे यावेळी तहसीलदार प्रशांत सांगडे म्हणाले.
तहसीलदारांनी घेतलेल्या निर्णयाचे वंचित बहुजन आघाडीचे राज्य उपाध्यक्ष प्रा. किसन चव्हाण यांनी कौतुक करून, असे अधिकारी असतील तर निश्चितच सर्वसामान्य लोकांना प्रशासनाकडून न्याय मिळेल. तहसीलदार प्रशांत सांगडे यांच्या सारख्या अधिकाऱ्यांची आज गरज आहे, असे सामाजिक भान ठेवून चांगले काम करणारे अधिकाऱ्यांसोबत वंचित बहुजन आघाडी कायम पाठीशी होती आहे आणि भविष्यातही राहील असेही प्रा. किसन चव्हाण म्हणाले
यावेळी शेवगाव तालुका अध्यक्ष शेख प्यारेलाल भाई, रविन्द्र निळ, गोरख तुपविहीरे, अरविंद साळवे व ईतर वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी ज्या घरकुल धारकांना वाळू पाहिजे असेल त्यांनी शेवगाव तहसीलदार प्रशांत सांगडे यांच्याशी संपर्क करावा असेही वंचित बहुजन आघाडी कडून आवाहन करण्यात आले आहे.
आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 9766445348 / 7385445348