आशीष अंबादे, वर्धा जिला प्रतिनिधि
मोबा. 8888630841
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा:- केंद्र सरकारने आणलेल्या नवीन वाहन कायद्या विरोधात मोठ्या प्रमाणात वाहन चालक संघटनेच्या वतीने निषेध करून आंदोलन करत आहे. या वाहन कायद्याला वाहन चालकांचा विरोध सुरू असताना आता हे आंदोलन अजून आक्रमक पवित्रा घेणार आहे.
मागच्या आठवड्यात केंद्र सरकारने पारित केलेल्या मोटार वाहन कायद्याला देशभरातील बस-ट्रक चालकांनी तीव्र विरोध केला. देशभरात अनेक ठिकाणी आंदोलने, मोर्चे काढत या कायद्याला विरोध दर्शवण्यात आला होता. त्यानंतर आता वर्ध्यात आज रात्री १२ वाजतापासून हिट अँड रन कायद्याविरोधात स्टेरिंग छोडो आंदोलन करणार आहे.
केंद्र सरकारने काढलेल्या ‘हिट अँड रन’ कायद्याच्या विरोधात वर्धेतील चालक संघटना आक्रमक झालेल्या आहेत. ‘जय महाराष्ट्र चालक वाहक’ संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयात अनेक चालकांनी धडक दिली. तसेच आज रात्री बारा वाजता पासून जिथे आपली गाडी आहे तिथेच वाहन उभे करून स्टेरिंग छोडो आंदोलन पुकारण्यात आले आहे. यामध्ये फक्त रुग्णवाहिका व स्कूल बस वगळता सर्व वाहने बंद असणार असल्याचे सांगण्यात आले. ट्रान्सपोर्ट व कार्पोरेशन धारकांनी केंद्र सरकारशी हात मिळवणी करून आमच्यासोबत विश्वासघात केला आहे. आम्हाला अंधारात ठेवून सरकारसोबत साठगाठ करून आंदोलनातून पाठिंबा काढून घेतला असल्याचा आरोप सुद्धा करण्यात आला आहे.
केंद्र सरकारने काढलेल्या ‘हिट अँड रन’ कायद्याच्या विरोधात वर्धेतील चालक संघटना आक्रमक झालेल्या आहेत. ‘जय महाराष्ट्र चालक वाहक’ संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयात अनेक चालकांनी धडक दिली. तसेच आज रात्री बारा वाजता पासून जिथे आपली गाडी आहे तिथेच वाहन उभे करून स्टेरिंग छोडो आंदोलन पुकारण्यात आले आहे.
यामध्ये फक्त रुग्णवाहिका व स्कूल बस वगळता सर्व वाहने बंद असणार असल्याचे सांगण्यात आले. ट्रान्सपोर्ट व कार्पोरेशन धारकांनी केंद्र सरकारशी हात मिळवणी करून आमच्यासोबत विश्वासघात केला आहे. आम्हाला अंधारात ठेवून सरकारसोबत साठगाठ करून आंदोलनातून पाठिंबा काढून घेतला असल्याचा आरोप सुद्धा करण्यात आला आहे. दरम्यान, आज रात्रीपासून स्टेरिंग छोडो आंदोलन करणार असल्याने सर्वसामान्य नागरिकांना या आंदोलनाची कुठली झळ पोहचू नये, म्हणून चालकांनी आंदोलनाच्या परवानगीचे निवेदन जिल्हाधिकारी तसेच पोलीस विभागाला सादर केले आहे.