जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मागर्दशन केंद्राच्या सहाय्यक आयुक्तांनी कळविले आहे.
प्रविण जगताप, वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी
मोबा. 9284981757
महाराष्ट्र संदेश न्यूज ! ऑनलाईन वर्धा:- जिल्ह्यातील सार्वजनिक क्षेत्रातील कर्मचारी असणा-या खाजगी क्षेत्रातील आस्थापनांनी ऑनलाईन त्रैमासिक विवरणपत्र ईआर 1 सादर करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
जिल्ह्यातील सर्व उद्योजक, कंपनी, आस्थापना, खाजगी शाळा, महाविद्यालय, जिल्हा परिषद, प्राथमिक शाळा, माध्यमिक शाळा, नर्सिंग होम, हॉस्पीटल, पेट्रोलपंप, हॉटेल्स, मोठी दुकाने, दुचाकी व चारचाकी शोरुम, विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था, को-ऑपरेटीव्ह बँक, राष्ट्रीय बँक, खाजगी कार्यालय, शासकीय कार्यालय, ट्रस्ट, स्वयंसेवी संस्था, गॅस एजन्सी, मॉल, शॉपिंग सेंटर, कृषि संस्था आदींनी महास्वयंम या संकेतस्थळावर ऑनलाईन नोंदणी करणे व मनुष्यबळाचे माहे जुलैचे त्रैमासिक विवरणपत्र ईआर 1 सादर करणे बंधनकारक आहे.
सदर त्रैमासिक विवरणपत्र कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता विभागाच्या www.mahaswayam.gov.in या संकेत स्थळावरुन ॲडमिनचा वापर करुन ऑनलाईन सादर करावे. प्रत्येक तीन महिन्यांनंतर 30 दिवसांच्या आत ईआर 1 ऑनलाईन सादर करणे कायद्याच्या सी.एन.व्ही कलम 1959 अन्वये बंधनकारक आहे. तसे न करणा-या कसुरदार उद्योजक व आस्थापनांवर रिक्त पदे सक्तीने अधिसुचित करणे कायदा 1959 मधील तरतुदीनुसार कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.
प्रत्येक नोंदणीकृत आस्थापनांनी आपला नोंदणी तपशिल अद्यावत करावा. आस्थापना प्रोफाईल मध्ये पॅन क्रमांक, टॅन क्रमांक, ईमेल आयडी व मोबाईल क्रमांक भरुन तसेच कंपनीचे आस्थापनाच्या नावात बदल केला असल्यास तसे अपडेट करावे.
अधिक माहिती व मार्गदर्शनासाठी जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मागर्दशन केंद्राच्या 07152-242756 या दुरध्वनी क्रमांकावर किंवा wardharojgar@gmail.com या ईमलवर संपर्क साधावा, असे जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मागर्दशन केंद्राच्या सहाय्यक आयुक्तांनी कळविले आहे.

