विश्वनाथ जांभूळकर एटापल्ली तालुका प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन एटापल्ली:- नुकत्याच गट्टा भागातील शेतकऱ्यांची सभा घेण्यात आली या मध्ये 50 गावापेक्षा अधिक गावातील शेतकरी उपस्थित होते. त्यात विविध शेतकऱ्याच्या विषयावर चर्चा करण्यात आली. यावेळी बारदान शेतकऱ्यांना वेळेवर उपलब्ध करून दयावा जेणेकरून शेतकऱ्यांना विक्रीस अडचणी होणार नाही आणि यावेळी आ. वि. स च्या सचिवाना कॉम्रेड सचिन मोतकुरवार यांनी तोंडी सांगितले ऑनलाईन आणि खरेदी पासून कोणताच शेतकरी वंचित असू नये कारण शेतकरी हा मूळ मालक आहे शेतकरी राबते तेव्हाच सर्व नागरिकांना त्याचा फायदा होतो म्हणून या बाबत नियमाप्रमाणे खरेदी करावे जेणेकरून शेतकऱ्यांना अडचणी व त्रास होऊ नये यांची काळजी घेण्यास सांगितले.
यावेळी सुरजागड पारंपरिक इलाकाचे अध्यक्ष सैनुजी गोटा व सचिव लक्ष्मण नवडी उपस्थित होतेत तसेच माजी सरपंच डोळगे गोटा, गट्टा चे प्रतिष्टीत व्यापारी विशाल पूज्जलवार, तानेद्र लेकामी, रमेश कवडो, रमेश महा, महादू कवडो, गट्टा उपसरपंच महारु लेकामी, जांभीया उपसरपंच उमेश हिचामी, व्येकटेश येनपरेड्डीवार व इतर विविध गावातील नागरिक उपस्थित होते.
आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 9766445348 7385445348

