महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन ललितपूर:- येथून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. शहरातील कोतवाली परिसरात चांदमारी येथे रविवारी रात्री 2 वाजताच्या सुमारास एक विवाहित तरुण आपल्या प्रेमिकेबरोबर बोलत होता. याला पत्नी विरोध केल्याने नराधम पतीने आपल्या पत्नीची आणि एक वर्षाच्या मुलीची निर्घृण हत्या केली. यानंतर घटनेला दरोडा आणि खुनाचे स्वरूप देण्यासाठी भिंतीवर डोके आपटून स्वतःला जखमी केले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नीरज कुशवाह वय 27 वर्ष रा. मोहल्ला चांदमारी हा विवाह सोहळ्यात सजावटीचे काम करतो. त्याचे एका मुलीसोबत प्रेमसंबंध होते. या कारणावरून त्यांचे पत्नी मनीषा वय 22 वर्ष हिच्याशी अनेकदा वाद होत होते. रविवारी रात्री उशिरा तो त्याच्या मैत्रिणीशी मोबाईलवर बोलत होता. त्यानंतर मनीषा जागी झाली. पतीला प्रेयसीशी बोलताना पाहून तिने विरोध केला. यावरून दोघांमध्ये हाणामारी झाली. काही वेळातच प्रकरण वाढले.
संतापलेल्या नीरजने खोलीत ठेवलेल्या क्रिकेटच्या बॅटने मनीषावर हल्ला करून तिची हत्या केली. यावेळी त्यांची एक वर्षाची मुलगी निपाक्षा हिला जाग आली. नीरजने तीचाही गळा आवळून हत्या केली. पत्नी आणि मुलीच्या हत्येनंतर नीरजने स्वतःला वाचवण्यासाठी कट रचला. कपाटात ठेवलेल्या वस्तू त्यांनी पसार करून रक्ताने माखलेली बॅट लपवून ठेवली. भिंतीवर डोके आपटून स्वत:ला जखमी केले.
यानंतर पहाटे पाचच्या सुमारास त्याने आपल्या मित्राला मोबाईलवर सांगितले की, अर्धा डझन मुखवटाधारी हल्लेखोरांनी त्याच्या घरात लुटमार करून पत्नी व मुलीची हत्या केली. तोही जखमी झाला आहे. हे ऐकून त्याचा मित्र आणि परिसरातील लोक घरी पोहोचले आणि नीरजला जिल्हा रुग्णालयात दाखल केले. एसपी मोहम्मद मुश्ताक, एएसपी अनिल कुमार यांच्यासह पोलिस दल घटनास्थळी पोहोचले आणि तपास केला.
सीसीटीव्हीत तरुणाचे खोटे पकडले
दुहेरी हत्याकांडाचा उलगडा करण्यासाठी एसपीने एएसपी आणि सीओ सदर यांच्या नेतृत्वाखाली सहा पथके तयार केली. परिसरात आणि आजूबाजूच्या घरांमध्ये बसवण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची झडती घेण्यात आली. कोणत्याही फुटेजमध्ये हल्लेखोर दिसत नव्हते. त्यामुळे पोलिसांना नीरजवर संशय आला आणि त्यांनी त्याला ताब्यात घेतले. चौकशीत तो तुटून पडला आणि त्याने दोन्ही खुनाची कबुली दिली. पोलिसांनी हत्येत वापरलेली बॅटही जप्त केली आहे.
मनीषा तिच्या शेवटच्या श्वासापर्यंत लढली.
रात्री मनीषा आणि नीरज मुलगी निपाक्षासोबत खोलीत झोपले असताना नीरज मोबाईलवर चित्रपट पाहत होता. मनीषा झोपल्यावर नीरजने त्याच्या मैत्रिणीशी बोलणे सुरू केले. दरम्यान, मनीषा उठली आणि बोलता बोलता नीरजला रंगेहात पकडले. यावरून दोघांमध्ये हाणामारी झाली. आरोपी नीरज पत्नी मनीषाला मारहाण करत असताना मनीषाने स्वत:ला वाचवण्यासाठी चार-पाच ठिकाणी नीरजच्या हाताला चावा घेतला. पण त्यानंतर नीरजने बॅटचा वापर करून मनीषावर जोरदार प्रहार केला आणि तिला जमिनीवर पडलं. यानंतर त्याची गळा आवळून हत्या करण्यात आली.

