संतोष मेश्राम राजुरा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन राजुरा:- 8 जानेवारी ला राष्ट्रमाता जिजाऊ माईसाहेब व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले संयुक्त जयंती सोहळाचे रामपूर येथे आयोजन करण्यात आले होते. यात विविध प्रबोधात्मक कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडले. त्यात मुख्य आकर्षण ठरले ते शाहीर संभाजी ढगे यांच्या कार्यक्रम होता.
या कार्यक्रमाचे उद्द्घाटन महेन्द्र सिंह चंदेल यांनी केले यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून समीर निमगळे संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती गोंडपिपरी, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट चे सुजित कावडे, युवक विधान सभा अध्यक्ष जहीर भाई, जिल्हा अध्यक्ष अल्पसंख्य राष्ट्रवादी काँग्रेस तसेच संतोष मेश्राम, माजी नगरसेवक स्वप्निल बजुजवर, रमेश झाडे तसेच उपसरपंच तसेच माजी ग्रामपंचयत सदस्य उपस्थित होते.
यावेळी रामपूर ग्रामवासी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. यावेळी महेन्द्र सिंह चंदेल यांनी राजमाता जिजाऊ आणि सावित्री बाई फुले यांच्या जयंतीनिमित्त मोलाचे मार्गदर्शन केले तसेच सरपंच झाडे यांनी सुधा मार्गदर्शन केले आणि राष्ट्रीय प्रबोधनकार शाहीर संभाजी ढगे यांनी आपल्या प्रबोधणात राजमाता जिजाऊ आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवनविषक क्रांतिकारी असे प्रबोधन केले.

