मुकेश चौधरी कार्यकारी संपादक
महाराष्ट्र संदेश न्युज ! हिंगणघाट:- विद्यार्थी जीवनातच नव्हे तर कोणत्याही वयात अक्षर सुधारणा करता येते आणी त्यातूनच विचारात बदल घडण्यासही प्रारंभ होतो, अर्थात सुंदर हस्ताक्षराने मनुष्य जीवन सुधारते तसेच हस्ताक्षरावरुन मनुष्यता स्वभाव गुणाची पारख करता येते असे शास्त्र विकसीत झालेले आहे असे प्रतिपादन भारतीय युवा संस्कार परीषदेचे संस्थापक तथा स्वयं हस्ताक्षर सुधार प्रकल्पाचे प्रचारक प्रदीपकुमार नागपुरकर यांनी केले. ते परडा (पाटी) येथील स्व. संजय गांधी विद्या निकेतन विद्यालयाचे संस्थापक माजी आमदार स्व. देवरावजी उर्फ दादासाहेब कोल्हे स्मृति पाच दिवसीय व्याख्यानमालेच्या उद्घाटनप्रसंगी सुंदर हस्ताक्षर व्यक्तिमत्वाचा दागीना ह्या विषयावर प्रथम पुष्प गुंफताना प्रदीपकुमार नागपुरकर बोलत होते. या कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून माजी प्राचार्य प्रभाकर कोळसे तर प्रमुख अतिथि विजय पराते, अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक मिलींद मुळे आदींची प्रमुख उपस्थिति होती.
यावेळी उद्घाटक म्हणून प्रा. प्रभाकर कोळसे म्हणाले की विद्यार्थी जीवन हे संस्कारमय मुल्यशिक्षणासह योग्य ते ज्ञान घेण्याचे वय असते त्यातही आपले हस्ताक्षर सुंदर करुन जीवन सुंदर करण्याचे भाग्य ह्या व्याख्यानमालेच्या निमित्याने मिळणे हे आपल्या ज्ञानात भर घालण्याचे मोलाचे कार्य ठरणार आहे असा मनोदय त्यांनी व्यक्त केला.
तर समोर बोलतांना प्रदीपकुमार नागपुरकर म्हणाले की, विद्यार्थी जीवनात स्वयंम् हस्ताक्षर सुधारातून आपण कलात्मकता त्रिसुत्रीचा अवलंबन करावा मी सरळ माझी रेषा सरळ, माझे जीवन सरळ हा अक्षर महामंत्र अक्षराणोम्- अकारोस्मि: ह्यातून अक्षरांचे महत्व विद्यार्थांना समजवून सांगतांना अक्षराच्या माध्यमातून देवी व देवत्व साकार करता येते असे सरळे, वाटोळे, मोकळे अक्षर कित्ते देतांना प्रदीपकुमार नागपुरकर यांनी सांगितले.
या कार्यक्रमाचे शेवटी विद्यालयाचे मुख्याध्यापक मिलींद मुळे यांनी प्रमुख अतिथींना संविधानाचे उद्देशिका भेटस्वरुप प्रदान केली तसेच ‘युवा-संस्कार’ मासिक पुस्तकें विद्यार्थांना व शाळेच्या शिक्षकांना भेट म्हणून देण्यात आले. सुत्रसंचालन उज्वला तितरे महाजन यांनी केले. यशस्वीतेसाठी बंडू लोंढे, धर्मेन्द्र झोटींग, डहाके, आसुटकर आदीसह सर्व शिक्षक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहकार्य केले.