तिरुपती नल्लला, राजुरा तालुका प्रतिनिधि
मो.9822477446
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन राजुरा:- सर्वोदय शिक्षण मंडळ चंद्रपूर द्वारा संचालित सरदार पटेल महाविद्यालय चंद्रपूर च्या वतीने राष्ट्रीय सेवा योजना शिबिराचे व सांस्कृतीक कार्यक्रमाचे आयोजन इंदिरा माध्य तथा उच्च माध्य विद्यालय वरुड रोड (ता. राजुरा) येथे दि.9.1.2024 रोजी माजी आमदार तथा सर्वोदय शिक्षण मंडळाचे उपाध्यक्ष सुदर्शन निमकर यांच्या हस्ते व मंडळाच्या अध्यक्ष श्रीमती सुधाताई पोटदुखे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाले.
या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी मंडळाचे सचिव प्रशांत पोटदुखे, मंडळाचे सदस्य जिनेश पटेल, प्रा. डॉ.प्रमोद कातकर, वरूर रोड ग्रा.पं. चे सरपंच गणपत पंधरे, उपसरपंच विजीता करमणकर, टेंबुरवाई सरपंच रामकृष्ण मडावी, साखरवाई च्या सरपंच सौ.वर्षा दौलतराव बोरकुटे, विभागीय समन्वयक प्रा.डॉ.उषा खंडाळे, कार्यक्रम अधिकारी सर्वश्री प्रा.डॉ. कुलदीप गोंड, प्रा.डॉ.राजकुमार बिरादार, प्रा.डॉ.पुरुषोत्तम माहोरे, प्रा.डॉ. निखिल देशमुख, मुख्याध्यापक प्रविण धोटे, तंटामुक्त समिती अध्यक्ष गणेश करमरकर, गुरुदेव सेवा मंडळाच्या बेबीताई धानोरकर, ज्येष्ठ नागरिक बाबुराव केवलवार, सह मान्यवर उपस्थित होते.
दिनांक 8 ते 13 जानेवारी पर्यंत चालणाऱ्या या शिबिरातून श्रमसंस्कार, सायबर सुरक्षा, रोजगार, स्वयंरोजगार, करिअर मार्गदर्शन, मतदार जनजागृती व युवकांचा सहभाग, विकसित भारत करिता तरुणांचे योगदान, विविध शासकीय योजनांची माहिती व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. ग्रामस्थांनी शिबिरार्थींना सहकार्य करून या उपक्रमांचा मोठ्या संख्येने लाभ घेण्याचे आवाहन मान्यवरांनी आपल्या मनोगतातून केले. उद्घाटनीय कार्यक्रमाला वरूर व परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.