आशीष अंबादे, वर्धा जिला प्रतिनिधि
मोबा. 8888630841
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा:- येथून एकवर्षा अगोदर एक खळबळजनक घटना घडली होती. येथील एका अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून तिला पळवून नेऊन व पुढे तिचे लैंगिक शोषण करण्यात आले होते. या घटनेचा तपासात पोलिसाना मोठे यश मिळाले आहे. पोलिसांनी आरोपीला भीमा कोरेगाव येथून ताब्यात घेतले आहे.
प्राप्त माहितीनुसार, एक वर्षापासून पीडित अल्पवयीन मुलगी बेपत्ता होती. मात्र कुटुंबाने तिचे अपहरण झाल्याची तक्रार केल्याने प्रकरण गंभीर झाले होते. सिंदी मेघे येथील राहणाऱ्या वृषाल उर्फ ऋषी राजेश मानकर वय 26 वर्ष या आरोपीने सदर मुलीस प्रेमाच्या जाळ्यात ओढले. 26 जानेवारी 2023 गणराज्य दिनाच्या रोजी पीडिता शाळेत जायला निघाली होती. याच वेळी आरोपीने डाव साधला. तिला फूस लावून पळवून नेले होते.
दुसऱ्या दिवशी मुलीच्या आईवडिलांनी रामनगर पोलीस स्टेशन गाठून पोलीसांत तक्रार दाखल केली होती. तब्बल एक वर्ष होऊनही मात्र दोघांचाही छडा लागत नसल्याने हे प्रकरण अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक विभागाकडे सोपविण्यात आले होते. या विभागाने तपास सुरू केल्यावर 22 दिवसांनी या आरोपीचा शोध लागला. आरोपी पूणे जिल्ह्यातील भिमा कोरेगाव येथे असल्याची माहिती मिळाली. पोलीसांनी हे गाव गाठून आरोपीस ताब्यात घेतले.
आरोपी वृषाल उर्फ ऋषी राजेश मानकर गत एक वर्षापासून भाड्याचे घर घेऊन निवासी असल्याचे स्पष्ट झाले. त्याला पोलीस कोठडीत डांबण्यात आले तर मुलीस आईवडिलांकडे सोपविण्यात आले. तपासात मुलीवर वारंवार अत्याचार करण्यात आल्याचे दिसून आले. आरोपी ऋषीवर विविध कलमा अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक नूरुल हसन, अपर पोलीस अधीक्षक डॉ.सागर कवडे, पोलीस निरीक्षक संजय गायकवाड, उपनिरीक्षक बालाजी लालपालवाले यांच्या मार्गदर्शनात निरंजन वर्भे, नितीन मेश्राम, नवनाथ मुंडे, शबाना शेख, अनुप कावळे यांच्या चमूने कारवाई फत्ते केली.

