उमेश इंगळे अकोला जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन अकोला:- केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले 15 जानेवारी ला अकोला दौऱ्यावर येत आहेत. त्यामुळे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले वतीने जिल्हातील नागरिकांना आव्हान करण्यात आले आहे.
अकोला जिल्ह्यातील तमाम बुद्ध कलावंत व साहित्य संगीतकार कवी गायक यांनी अकोला जिल्ह्यामध्ये कलावंताचे प्रश्न निकाली काढण्यासाठी अकोला जिल्ह्यात रामदास आठवले केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री त्यांचे आगमन होत आहे तरी कलावंतांनी व अतिमान अतिक्रमण धारक, भूमीहीनांनी व बेघर असणाऱ्या झोपडपट्टी वाशियांना आव्हान आहे की आवाज उठवणारे आंबेडकरी नेते रामदास आठवले हे येत आहे त्यामुळे कलावंतांना न्याय मिळवून देण्यासाठी झोपडपट्टी विकासासाठी आणि अतिक्रमण भूमीसाठी ज्वलंत असलेले प्रश्न मार्गी लावणार आहेत.
दिनांक 22 डिसेंबर 2023 ला रामदास आठवले यांनी यवतमाळ मुक्कामी असताना अकोल्याचे जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद अकोला यांना दूरध्वनी द्वारे कलावंतासाठी त्यांचे दाखल झालेले प्रस्ताव 210 मंजूर करावे व पंचायत समितीला पुनश्च आदेश देऊन आधीच देऊन पुरवणी यादी पाठवण्यासाठी प्रयत्न करावे 210 पैकी फक्त 49 प्रस्ताव पाठवण्यात आले आणि 160 प्रस्ताव पुन्हा वापस करण्यात आले. योग्य असलेले प्रस्ताव वापस न करता त्यांना मंजुरी देण्यात यावी याकरिता जिल्ह्याचे अध्यक्ष सुनील अवचार रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया अकोला यांच्या वतीने धरणे आंदोलन सुद्धा देण्यात आले होते.
त्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी त्वरित प्रश्न निकाली काढण्याचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद अकोला यांनी दिलेल्या माहितीनुसार पुनश्च कलावंत प्रस्तावाचे काम सुरू झाले काम सुरू झाले आणि ते काम मार्गी लागल्यामुळे 15 तारखेला जर पूर्तता झाली नाही तर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले हे गटांचे महासचिव जे पी सावंत यांनी शासनाला इशारा दिल्यामुळे कलावंताचे काम निश्चित होईल अशी आशा या ठिकाणी करण्यात येत असून न झाल्यास अन्नत्याग आमरण उपोषण कलावंत संघटना व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया अकोला जिल्हा यांच्या वतीने करण्यात येईल अशा इशारा यावेळी देण्यात आला आहे.
त्यामुळे सर्व कलावंतांना आव्हान आहे की आपण जास्तीत जास्त संख्येने दिनांक 15 रोजी खुलेनाट्यगृह बाबासाहेब आंबेडकर सभागृह येथे उपस्थित रहावे. अतिक्रमण धारक, झोपडपट्टी वाशी यांना सुद्धा या ठिकाणी आपल्या समस्या व तसेच जीआर बाबत मार्गदर्शन होईल आणि कलावंतांना पाच हजार रुपये मानधन कलावंतांना संगीत वाद्य मोफत व इतर सुखसुळीच्या बाबत चर्चा करतील व अतिक्रमण अतिक्रमण धारकांना कायमस्वरूपी पट्टे देण्याबाबत चर्चा करतील.
झोपडपट्टीवाशी यांना नमुना आठ मध्ये भोगवटदाराची टाकू नये याबाबत सुद्धा जिल्हाधिकारी अकोला व मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद अकोला यांच्यासोबत चर्चा करून अकोला जिल्ह्याच्या मागण्या मंजूर करून घेतली व सर्वांना याबाबत दिलासा मिळेल त्यानुसार आपण कलावंत भूमी आणि झोपडपट्टी विकासवाशी यांनी काय कामाला जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन कलावंत संघटनेचे मिलिंद बनसोड, डीजे वानखडे, देवानंद आंबोरे, बुद्ध कलावंत संघटनाचे प्रमुख शाहीर खंडोजी शिरसाट यांनी केले आहे.