अकोला जिल्हा पोलीस अधीक्षकानी भेटीनंतर 18 तास राबवीली धडक शोध मोहीम. 4 अधिकारी आणि 28 अमंलदार यांचा सहभाग. एका रात्री शेगाव, हातरून, नखेगाव, नेर थामना, वाशिम जिल्हयातील रिसोड येथून असे एकुण 5 आरोपी ला ठोकल्या बेड्या.
उमेश इंगळे अकोला जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन अकोला:- दिनांक 30 डिसेंबर 2023 रोजी पोलीस स्टेशन उरळ हद्दीत पोलीस कर्मचाऱ्यावर गोळीबार करण्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. त्यामुळे संपूर्ण जिल्हात खळबळ उडाली होती. 15 दिवसानंतर या घटनेतील आरोपींना पकडण्यात पोलिसांना यश आले आहे.
30 डिसेंबर ला रात्रगस्त करणारे अधिकारी हे त्यांचे सहकारी सोबत कर्तव्य बजावीत असतांना रात्री 3.00 वाजताच्या सुमारास ग्राम मांजरी वरून हातरूनकडे जात असतांना पोलीस गस्त वाहनाला दोन मोटार सायकलीवर असलेल्या आरोपींनी दुरून येतांना दिसून आल्याने त्यांनी आपली शासकीय वाहन थांबवून येणाऱ्या मोटार सायकल चालकाना थांबविण्याचा ईशारा केला असता त्यांना समोर पोलीस असल्याची चाहुल लागल्याने त्यांनी आपआपली मोटार सायकली वळवून पळूण जाण्याच्या उद्देशाने जात असता पोलीसांना त्याचे वर संशय आल्याने पोलीसांनी क्षणाचाही विलंब न करता त्याचा पाठलाग केला असता, पोलीस त्यांना पकडणार तेवढ्याचे मोटार सायकल स्वार याचे मागे बसलेल्या ईसमाने पोलीसांच्या गाडीचे काचवर अग्निशस्त्रने फायर केला असता गाडीचा काच फुटली ज्यात पोलीस गाडीतील चालकचे डोळ्याला ईजा झाली होती. ज्यामुळे फायदा घेवून आरोपी पसार झाले होते. सदर गुन्हयात आरोपीतांना पोलीसांना जिवेमारण्याच्या उद्देशाने अग्निशस्त्राचा वापर करून फायर केल्याचे तपासा दरम्याण निष्पन्न झाल्याने कलम 307 भादंवि वाढविण्यात येत आहे.
अकोला जिल्हयात प्रथमच पोलीसांचे गाडीवर झालेल्या गोळीबाराचे घटनेचे जिल्हयात तसेच राज्याच पडसाद उमटून विविध चर्चाना उधान असता, गुन्हेगार यांना जेरबंद करने जिल्हा पोलीसांना आव्हान ठरले होते. घटना घडल्या पासून स्थागुशा यांचे एक पथक हे पो. स्टे उरळ व परिसरात गोपनिय माहीती संकलीत करीत होते.
नवनियुक्त पोलीस अधीक्षक श्री. बच्चन सिंह यांनी सदर घटनेचे गांर्भीय लक्षात घेवून घटनेच्या ठिकाणी दिनांक 13 जानेवारी रोजी भेट देवून गोळीबार झालेल्या ठिकाणी अधिकारी आणि अमंलदार यांना सुचना देवून आरोपी निष्पन्न करून गुन्हा उघडकीस आणण्या बाबत आदेशीत होते तसेच सदर गोळीबार करणा-या घटनेची माहीती जो कोणी देणार त्यास 25 हजार रुपयाचे बक्षीस जाहीर केले होते. पोलीस अधीक्षक बच्चन सिंग यांनी दिलेल्या सुचना प्रमाणे पो.नि श्री. शंकर शेळके यांनी आतापर्यंत केलेल्या तपासाचा व स्थानीक गुन्हे शाखा कडे प्राप्त झालेल्या गोपनिय माहीतीचा खातरजमा करून याच वेळे पासून कार्यवाही सुरू केली. ज्यात 4 अधिकारी आणि 28 अमंलदार यांनी सहभाग घेतला.
यावेळीपोलिसांनी सुरू केलेल्या शोथ मोहीम दरम्याण ग्राम हातरून, नखेगाव, नेर थामना, शेगाव, वाशिम जिल्हयातील रिसोड येथून गुन्हा करणारे आरोपी १) अश्विन गणेश मुंडे वय 21 वर्ष रा. ग्राम नखेगाव २) भावेश उर्फ अर्जुन रविंद्र मुंडाले वय 19 वर्ष रा. ग्राम नखेगाव. ह. मु हातरून विटाचे भट्यावर ३) सागर ज्ञानेश्वर चौके वय 25 वर्ष रा. ग्राम नेर धामना. ४) अविनाश भिमराव मुंडाळे वय 26 वर्ष रा. ग्राम नखेगाव. ५) योगेश रामराव मुंडाळे वय 26 वर्ष रा. नखेगाव यांना ताब्यात घेवून त्यांना खाकी धसका दाखवताच आरोपीतांनी घडलेला घटनाक्रम सांगण्यास सुरुवात केली. आणि गुन्हा केल्याची कबुली दिली.
सदरची कारवाई ही पोलीस अधीक्षक अकोला बच्चन सिंह, अपर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे, सहा. पोलीस अधीक्षक गोकुळ राज, यांचे मार्गदर्शनात पो.नि शंकर शेळके स्थागुशा अकोला, सपोनि. कैलास डी. भगत, पोउपनि, गोपाल जाधव स्थागुशा. पो. अमंलदार भास्कर धोत्रे, रविंद्र खंडारे, सुलतान पठाण, महेंद्र मलिये, अब्दुल माजीद, अविनाश पाचपोर, एजाज अहेमद, वसीमोद्दीन शेख, विशाल मोरे, भिमराव दिपके, स्वप्नील खेडकर, सतीष पवार, चालक नफीज शेख, अक्षय बोबडे, प्रविण कश्यप तसेच नखेगाव व नेर गाव हे पो. स्टे दहीहांडा हद्दीत येत असल्याने तेथील ठाणेदार योगेश वाघमारे व 8 अमंलदार यांचे सहकार्य लाभले.