सेवानिवृत्त अरुण राखडे यांना शाल व भेट वस्तू देऊन सत्कार करण्यात आला
मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन गडचिरोली:- वन परिक्षेत्र कार्यालय कमलापूर येथे चौके साहेब वन परिक्षेत्र अधिकारी यांचे अध्यक्षतेखाली राजाराम उपक्षेत्रातील वनपाल व कमलापूर वनपरिक्षेत्रतील लेखापाल यांचा दिनांक 31 डिसेंबर 2023 रोजी यांचा नियत वयोमानानुसार शासकीय सेवेचा कार्यकाळ पूर्ण झाला व दि.12 जानेवारी रोजी सेवानिवृत्तीपर निरोप समारंभ कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष वनपरिक्षेत्र अधिकारी श्री. चौके होते यावेळी प्रमुख अतिथी म्हणून डाॅ. येमचे, आशाचे क्षेत्र सहाय्यक श्री. वरखडे, कोडसेपल्लीचे क्षेत्र सहाय्यक श्री. येडलावार, कमलापूर क्षेत्र सहाय्यक श्री. मडावी, वनरक्षक कु, पदा, लिंगमपल्ली वनरक्षक श्री. टेकाम, वनरक्षक.श्री. पानेम वनरक्षक तसेच कार्यालयीन कर्मचारी श्री.राजु भट्ट कार्यालयीन कर्मचारी अक्षय सोनटक्के उपस्थित होते.
यावेळी सत्कारमुर्ती श्री. अरुण राखडे सेवानिवृत्त व श्री अडेपू सेवानिवृत्त यांना शाल व भेट वस्तू देऊन निरोप देण्यात आला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन क्षेत्र सहाय्यक वरखडे यांनी केले तर आभार श्री. मडावी यांनी मानले. या कार्यक्रमात कमलापूर वन परीक्षेत्रातील सर्व वन कर्मचारी, वनमजूर उपस्थित होते.

