राज शिर्के, मुंबई शहर प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन मुंबई:- आज मोठ्या उत्साहात अयोध्येत राम मंदिरात श्रीरामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झाली. यावेळी देश विदेशातून अनेक प्रमुख अतिथीच्या उपस्थिती हा नेत्रदीपक सोहळा संपन्न झाला. श्रीराम जन्मभूमी ट्रस्टने महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना या भव्यदिव्य सोहळ्याचं आमंत्रण पाठवले होते. पण एकनाथ शिंदे हे या सोहळ्याला उपस्थित राहू शकले नाही.
श्रीरामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे केंद्रीय मंत्रिमंडळातील अनेक मंत्री, अनेक राज्यांचे मुख्यमंत्री, मोठे नेते, कारसेवक, खेळाडू, कलाकार आणि साधू-संतांसह तब्बल 7000 हून अधिक लोकांना या सोहळ्याचं निमंत्रण पाठवण्यात आलं आहे. अयोध्येत या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची जय्यत तयारी सुरू होती. श्री राम जन्मभूमी ट्रस्टने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनादेखील या सोहळ्याचं निमंत्रण पाठवलं आहे. परंतु, एकनाथ शिंदे या सोहळ्याला जाणार नाहीत.
एकनाथ शिंदे त्यांनी स्वतः याबाबतची माहिती दिली आहे. एकनाथ शिंदे यांनी राम मंदिरातील प्राणप्रतिष्ठा सोहळ्याबाबत सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे. यामध्ये म्हटलं आहे, जय श्री राम! अयोध्येत राम मंदीर उभारणीचे कोट्यवधी भारतीय आणि रामभक्त तसेच हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं स्वप्न देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी साकारलं आहे. यासाठी मोदींचे शतशः आभार. अयोध्येमध्ये सोमवारी श्री रामचंद्रांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होत आहे. या ऐतिहासिक आणि नेत्रदीपक सोहळ्याचे आम्हाला निमंत्रण आहेच.
देशवासियांसाठी अभिमानास्पद अशा या अभूतपूर्व क्षणाचे साक्षीदार फक्त मी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच अजित पवार अशा तिघांनीच होण्याऐवजी संपूर्ण मंत्रिमंडळ, खासदार, आमदार, लोकप्रतिनिधी आणि राज्यातील रामभक्त अशा सर्वांना घेऊन प्रभू श्रीरामाचं दर्शन आम्ही घेणार आहोत. अयोध्येतल्या दर्शनाची तारीख आणि वेळ लवकरच ठरवत आहोत.