श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन बीड:- येथून एक एक खळबळजनक घटना समोर आली आहे. येथे एका नराधम चुलतीने बदला घेण्याच्या भावनेतून चक्क चिमुकल्या बहिण आणि भावाला विष देऊन मारल्याची घटना समोर आली आहे. ही घटना बीड येथे घडली असून या घटनेनंतर बीड गावात संताप व्यक्त करण्यात येत आहे. पोलिसांनी आरोपींला बेड्या ठोकल्या असून 20 दिवसांनंतर पोलिसांनी हत्येचा उलगडा केला आहे. तनूजा वय 2 वर्ष किशोर अमोल भावले वय 13 महिने अशी मृत बालकांची नावे आहेत. स्वाती उमाजी भावले असं आरोपीचे नाव आहे.
प्राप्त माहितीनुसार, ही खळबळजनक घटना 29 डिसेंबर 2023 रोजी घडले होती. गेवराई तालुक्यातील पांढरवाडी येथील तनुजा आणि किशोर या दोन भांवडाची पूर्व वैमनस्यातून हत्या केल्याचे समोर आले आहे. 29 डिसेंबरच्या दुपारी अचानक उलट्या सुरु झाल्यानंतर दोघांनाही तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. दोघांवर वेगवेगळ्या खासगी रुग्णालयात उपचार करण्यात आले. किशोरला बीडच्या रुग्णालयात तर तनुजाला छत्रपती संभाजीनगरच्या एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. यावेळी दोघांचा उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला.
या प्रकरणात सुरुवातीला तलवाडा पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती. काही दिवसांनी ही घटना हत्येची असल्याचे समोर आले. पोलिसांनी घरात चौकशी सुरु केली आणि तपासणी करता करता त्यांना आरोपींचा शोध लागला. काही महिन्यांपूर्वी शेजारी राहणाऱ्या सखुबाई ज्योतीराम भावले हिने आरोपी स्वाती हिचा सासरा सुखदेव भावले याने माझी लेक वैशाली हिला नांदु दिले नाही. बदला घेण्याच्या हेतूने दोघांनाही उंदीर मारण्याचे औषध खाऊ घातले. मयत मुलांना औषध देणारी आरोपी स्वाती ही मुलांची चुलती होती. चौकशीतून सर्व घटना उघडकीस आल्या असून पोलिसांनी गुन्हा दाखल करत आरोपींना ताब्यात घेतले आहे.
स्वातीला मी तुला 4 लाख रुपये देईल, तेवढंकाम कर, तुझा कोणाला संशय येणार नाही, तु असे केल्यास तुझी जाऊ येथे राहणार नाही, मग तू एकठीच इथे राहशील असे सांगितले. त्यानुसार सखुबाई भावले आणि स्वाती भावले या दोघींनी संगनमताने कट रचला आणि 29 डिसेंबर 2023 रोजी दुपारच्या सुमारास सखुबाई हिने आणून दिलेले उंदिर मारण्याच्या व्यूबमधील औषध स्वाती हिने बोटाने काढून तनुजा आणि किशोर या दोघांना चाटविले, त्यानंतर त्यांना उलव्या झाल्या आणि उपचारा सुरू असतांना दोघांचा मृत्यू झाला. अशी तक्रार मयत मुलांचे वडिल अमोल सुखदेव भावले यांनी तलवाडा पोलिस ठाण्यात दिली. या तक्रारीवरून सखुबाई भावले, स्वाती उमाजी भावले यांच्याविरूध्द कलम 302, 102-ब, 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.