प्रविण जगताप, वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी
मोबा. 9284981757
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा, दि.२३:- विकसित भारत संकल्प यात्रा अंतर्गत कारंजा तालुक्यातील ग्रामपंचायत गवंडी येथे यात्रा मोहिमेचे जिल्हा प्रभारी सम्राट राही (आयआरएस) यांनी भेट देऊन नागरिक व लाभार्थ्यांशी संवाद साधला. केंद्र शासन विविध प्रकारच्या योजना राबविते, त्याचा लाभ घेण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.
या कार्यक्रमास श्री.राही यांच्यासह तहसीलदार ऐश्वर्या गिरी, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष सरिता गाखरे, गटविकास अधिकारी प्रवीण देशमुख, तालुका कृषी अधिकारी श्री.देशमुख व इतर विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
केंद्र शासनाच्या वतीने विविध ३४ प्रकाच्या फ्लँगशिप योजना राबविण्यात येत आहे. या योजनांच्या लाभापासून अद्यापही वंचित असलेल्या पात्र लाभार्थ्यांना लाभ मिळवून देण्यासाठी विकसित भारत संकल्प यात्रा ही मोहीम राबवली जात आहे. या मोहिमेंतर्गत प्रत्येक गावात चित्ररथाद्वारे जनजागृती व विविध शिबिरांचे आयोजन करुन पात्र व्यक्तीस योजनांचा लाभ मिळवून दिला जात आहे.
गवंडी येथे आयोजित या कार्यक्रमात यात्रा मोहिमेचे जिल्हा नोडल अधिकारी सम्राट राही यांनी सहभाग घेतला. कार्यक्रमात जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गवंडी येथील विद्यार्थ्यांनी स्वच्छ भारत मिशन अंतर्गत स्वच्छतेवर पथनाट्य सादर करून ‘धरती कहे पुकार के’ या कार्यक्रमाचे सादरीकरण केले. यावेळी विविध योजनेचा लाभ घेतलेल्या लाभार्थ्यांनी ‘मेरी कहानी, मेरी जुबानी’ अंतर्गत मनोगत व्यक्त केले.
या कार्यक्रमात श्री.राही यांच्याहस्ते मंजुरी पत्र, प्रशस्तीपत्र व सन्मान पत्राचे वितरण करण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन पंचायत समितीचे विस्तार अधिकारी कैलास वानखेडे यांनी केले. यावेळी गावकरी, लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यात्रेनिमित्त विविध विभागाच्या वतीने स्टाँल लावण्यात आले होते.