मुकेश चौधरी कार्यकारी संपादक
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- 23 जानेवारी 2024 रोज मंगळवारला, हिंगणघाट शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) या पक्षातर्फे स्थानिक शिवसेना कार्यालय कारंजा चौक येथे ठीक 11.00 वाजता तालुका प्रमुख सतीश धोबे, शहर प्रमुख सतीश ढोमणे यांच्या प्रमुख उपस्थितीत तथा काँग्रेसचे नेते हिंगणघाट नगर पालिकेचे माजी नगराध्यक्ष पंढरी कापसे यांच्या अध्यक्षतेखाली हिंदूहृदयसम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे व नेताजी सुभाष चंद्र बोस यांची जयंती कार्यक्रम पार पडला.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपतालुका प्रमुख प्रकाश अनासाणे यांनी केले तर प्रस्ताविक पर ज्येष्ठ शिवसैनिक तथा माजी नगरसेवक श्रीधर कोटकर मानले. यावेळी श्रीधरभाऊ कोटकर यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनपटावर विस्तृत माहिती दिली. तसेच युवासेनेचे जिल्हाप्रमुख अभिनंदन मनोत यांनी सुद्धा आपले मनोगत व्यक्त केले. तसेच माजी नगरसेवक मनीष देवडे यांनी या ठिकाणी नेताजी सुभाषचंद्र बोस व बाळासाहेब ठाकरे यांच्या कार्याबद्दल माहिती या ठिकाणी विषद केली. अध्यक्षीय भाषण पंढरी कापसे यांनी जयंतीनिमित्त करण्यात आले.
यावेळी या ठिकाणी बाळासाहेब ठाकरे व नेताजी सुभाष चंद्र बोस यांच्या जय घोषाने परिसर दणाणून सोडला. नेताजी सुभाषचंद्र बोस की जय !! माननीय बाळासाहेब ठाकरे यांचा विजय असो !!! जय भवानी !! जय शिवाजी !!! तुम मुझे खून दो, मै तुम्हे आजादी दूंगा !! अशा प्रकारच्या घोषणा देत परिसर दणाणून सोडला. यावेळी मिठाईचे वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमात शिवसेना महिला आघाडी, युवा सेनेचे पदाधिकारी शिवसैनिक महिला आघाडीच्या शहर संघटिका सीमा गलांडे, माजी नगरसेविका नीता धोबे, सीमा खूपसरे, नीलिमा मोहम्मारे , प्राची पाचखेडे, स्वाती पिंपळकर, भोला सिंग चौहान, शहर संघटक गजानन काटोले, गंगाधर बोधाने, अनंता गलांडे, संजय पिंपळकर. आशिष जयस्वाल, भास्कर मानकर, भूषण काटकर युवा सेना शहर प्रमुख, हिरामण आवारी, सुनील अष्टीकर, सुरेश चौधरी, भास्कर ठवरे, बंटी वाघमारे, गौरव गडेकर, विनोद मोहोळ, नितीन वैद्य, दिलीप वैद्य, शंकर मोहम्मारे, भास्कर भिसे, डॉ. जगताप, डाॅ. खेवले, दिनेश धोबे, नरेंद्र गुळकरी, गोवर्धन शाहू, महेश वैद्य, दिलीप आमगे, महेंद्र दिक्षित, अनिल कडू, प्रकाश भुसारी, प्रभू बडे, वैभव कापकर, प्रशांत आवारी, निखिल झिबड, अनंता सोरटे, आशिष भांडे, आकाश सुरकार, मुन्ना श्रीवास, रवी रंगारी, ओमकार भोयर, सुभाष काटकर, उमेश निरगुडे, रामाजी सातघरे, गुणवंत वानखडे, महेश खडतकर, प्रमोद खडतकर, कवडू कळंबे, महादेव लंबाडे, देविदास चौधरी, अंकुश ससाने, गजू टोनपे, अशोक भगत इत्यादी शिवसैनिक युवा सैनिक महिला आघाडीचे पदाधिकारी उपस्थित होते.