अनिल अडकिने नागपूर सावनेर प्रतिनिधी
मो. नं. ९८२२७२४१३६
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सावनेर २५ जाने:-सावनेर पब्लिक स्कूल गुजरखेडी सावनेर येथे १७ जानेवारी ते १९ जानेवारी पर्यंत स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात आले.
१७ जानेवारीला कार्यक्रमाचे उद्घाटनप्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी सौ मुक्ताताई कोकड्डे अध्यक्ष जिल्हा परिषद नागपूर उपस्थित होत्या. तर प्रमुख पाहुणे म्हणून कुंदाताई राऊत उपाध्यक्ष जिल्हा परिषद नागपूर, प्रवीण झाडे सरपंच ग्रामपंचायत बोरुजवाडा, प्रभाकर डहाके (पाटील) अध्यक्ष ताजुद्दीन बाबा ट्रस्ट वाकी, रत्नाकर डहाके (पाटील) संचालक सावनेर पब्लिक स्कूल, अरविंद सिंग पालक सभासद, भास्कर मोवाडे, सौ ममता अग्रवाल मुख्यध्यापिका (सीबीएसई बोर्ड), सौ वैशाली देशपांडे मुख्यध्यापिका (स्टेट बोर्ड) या सर्व
प्रमुख पाहुण्याच्या हस्ते दीप प्रज्वलन करून उद्घाटन करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. तसेच दुसऱ्या दिवशी सुद्धा पालक वर्गाणी सांस्कृतिक कार्यक्रमाचा आस्वाद घेतला.
१९ तारखेला बक्षीस वितरणाच्या सोहळ्या कार्यक्रमाचे अध्यक्षपद निखिलेश कुंभार सिंग सब एरिया मॅनेजर वेकोली सावनेर, प्रमुख पाहुणे म्हणून राजेश सरक आरटीओ अधिकारी, रामराव मोवाडे जिल्हा सचिव भाजपा नागपूर, राजूभाऊ घुगल भाजपा सावनेर शहर अध्यक्ष रत्नाकर डहाके (पाटील) संचालक सावनेर पब्लिक स्कूल, नंदकिशोर अटाळकर, सौ.ममता अग्रवाल मुख्यध्यापिका, सौ.वैशाली देशपांडे मुख्यध्यापिका तसेच सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, पालक उपस्थित होते.
यावेळी मान्यवरांच्या हस्ते विजयी विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण करण्यात आले. बक्षीस प्राप्त विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष डॉ. अशोक जिवतोडे, सचिव सौ.प्रतिभा जीवतोडे यांनी अभिनंदन केले. या कार्यक्रमाच्या यशस्वीते करिता चंद्रकांत कोमुजवार, अमोल जीवतोडे, प्रफुल नारनवरे, मंगेश मेश्राम, मंगला जोगी, पायल सूर्यवंशी, योगिता घोरमारे,योगिता आसोले, सुनिता कोरे, पद्मा हिरतकर, दिनेश निखाडे व इतर शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.