अनिल अडकिने नागपूर सावनेर प्रतिनिधी मोबा. नं.९८२२७२४१३६
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सावनेर २५ जाने:- यमराजाची नगरी सावनेर येथे सोमवार दिनांक 22 जानेवारीला अयोध्या येथे प्रभु श्रीरामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठाचे औचित्य साधून सावनेर येथिल गजानन महाराजांच्या मंदिरामध्ये ३ कारसेवकांचा डॉ.विजय धोटे यांच्या हस्ते शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
अयोध्या येथिल प्रभु श्रीरामाच्या मूर्तीची प्राण प्रतिष्ठाचा दिवस इतिहासामध्ये स्वर्ण अक्षरात लिहिण्यात येईल. राम मंदिर बनने हे लाखो कारसेवकांचे स्वप्न होते ते पुर्ण झाले. अनेक कारसेवकांच्या प्रयत्नामुळेच आपल्याला हा स्वर्ण दिवस पाहायला मिळत आहे. राममंदिर निर्माण मध्ये कारसेवकांचा मोठा वाटा आहे. असे प्रतिपादन यावेळी डॉ.विजय धोटे यांनी व्यक्त केले.
६ डिसेंबर १९९२ ला अयोध्यामध्ये कारसेवा करणारे सावनेरचे अनसंग हिरो विनोद बुधोलिया, विनोद बागडे आणि विनोद गुप्ता होते. यावेळी सत्कारमूर्तींनी अयोध्यातील राम मंदिर उभारणी बाबत आपले अनुभव सांगितले.
आम्ही तिघे कार सेवक आयोध्या मध्ये पोहोचलो तेव्हा तेथील घडलेल्या प्रकारामध्ये रक्तबंबाळ, अपंगत्व. तर काही कार सेवकांचा मृत्यू सुद्धा झाला. तेव्हाचे कारसेवकांचे बलिदान आज सार्थक झाले. तसेच विश्व हिंदू परिषदेचे प्रवीण तोगडिया, अशोक सिंघल, साध्वी ऋतुंभरा, लालकृष्ण आडवाणी, मुरली मनोहर जोशी, उमा भारती यांचे सुद्धा योगदान लाभले हजारोंच्या संख्येने पोहोचलेल्या जथ्यात आम्ही सामील झाल्याचे कारसेवकांनी सांगितले. ट्रेनमध्ये असलेले वॉशरूममध्ये आणि डब्यावर बसून आम्ही सुखरूप घरी पोहोचलो.
या कार सेवकांचा सत्कार प्रसंगी उपस्थितांमध्ये प्रमोद ढोले, पप्पू पोपली, दीपक कटारे, अनिल अडकिने, महेश चकोले, विनोद राऊत, प्रशांत नारेकर, राजेंद्र कुथे, अमरिश मिश्रा, प्रफुल मोवाडे, बबलू आवते, यश ढोले, दिपाली ढोले व इतर नागरिकांनी कारसेवकाचे अभिनंदन केले.