प्रविण जगताप, वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी
मोबा. 9284981757
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- नूतन भारत शिक्षण संस्था व नवप्रगती शिक्षण संस्था, वडनेर द्वारा संचालित इंदिरा गांधी माध्यमिक विद्यालय, कला व वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालय वडनेर, नवकेतन विद्यालय जामनी व के टी महाजन उच्च प्राथमिक शाळा वडनेर यांच्या संयुक्त विद्यमाने वार्षिक सांस्कृतिक कार्यक्रम व सत्कार समारंभ मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.
या कार्यक्रमाचे उद्घाटन हिंगणघाट बाजार समितीचे सभापती अँड सुधीर कोठारी यांनी केले तर या कार्यक्रमाचे अध्यक्ष नूतन भारत शिक्षण संस्था अध्यक्ष व नवप्रगती शिक्षण संस्था वडनेर कृष्णाजी महाजन हे होते. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माजी आमदार प्रा राजुभाऊ तिमांडे, अध्यक्ष सेवा स आयुर्वेदिक दवाखाना श्रीचंदजी कोचर, माजी जिल्हा परिषद सदस्य वसंतराव आंबटकर, सरपंच सौ कविता वानखेडे, अध्यक्ष साईश्रद्धा शिक्षण संस्था राजेश्वरराव महाजन, माजी सरपंच विनोद वानखेडे, अध्यक्ष खरेदी विक्री दिगंबर चांभारे, उपाध्यक्ष राजेंद्र भोरे, सचिव नूतन भारत शिक्षण संस्था सौ संगीता महाजन, ठाणेदार पो स्टे वडनेर संजय मिश्रा, उपाध्यक्ष नूतन भारत शिक्षण संस्था बळवंतराव सुपारे, मॅनेजर बँक ऑफ इंडिया, गणेश जयस्वाल, अहमदखान पठाण, महादेवराव महाजन, याप्रसंगी प्राचार्य सौ वंदना खैरे (इंदिरा गांधी माध्यमिक विद्यालय वडनेर), मुख्याध्यापक योगेश्वर कलोडे नवकेतन विद्यालय जामनी, मुख्याध्यापिका कु जयश्री कृष्णाजी महाजन के टी महाजन उच्च प्राथमिक शाळा वडनेर व पालक वर्ग यांच्यासह समस्त शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी व विध्यार्थ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.