अक्षय अरुण म्हात्रे, पेण तालुका प्रतिनिधी
मोबा. 7276222387
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन पेण:- दुर्लक्षित खारेपाट विभागातील समस्यांना वाचा भोडण्यासाठी भाल विठ्ठलवाडी येथील समुद्रकीनारी ग्रामस्थांनी आपल्या विविध मागण्यासाठी आज दिनांक २५ जानेवारी पासून बेमुदत उपोषणास सुरू केले आहे.
उपोषणकर्त्यांच्या प्रमुख मागन्या 1. नारवेल बेनवले या 16 किमी बंदिस्तीचे नितृष्ट झालेलं काम अंदाज पत्रकानुसार नव्याने मजबूत व टीकाऊ काम करण्यात यावे 2. उघाडी नंबर 5 आणि 3 शेताच्या बाजूने दगडी पिचिंग लावणे 3. टॉपची रुंदी ही इस्टेमेंट नुसार 3 मीटर करून देणे 4.बांध्याऱ्यावर टाकण्यात आलेले मुरूम इस्टेमेंट प्रमाने रोलिंग टाकण्यात यावे. 5. विठ्ठलवाडी येथे गेलेली खाड याला 1 ते 1.5 किलोमीटर दगडी वाल टाकणे 6. सर्व पकट्याच्या बांधकामाची इस्टेमेंट प्रमाने माहिती देणे व अंदाजपत्रक सादर करणे.7. शेतीकडे जाण्यासाठी वाहणसाठी रस्ता करणे व रॅम रुंद करणे अशा विविध मागण्यासाठी हे आंदोलन करण्यात येत आहे.
आपल्या परिसरातील विविध मागण्यासाठी शासन आणि प्रशासन यांना अनेकदा निवेदन देण्यात आले पण नागरिकाच्या या मागण्या अद्याप पूर्ण झाल्या नाही त्यामुळे नागरिकांनी बेमुदत उपोषणाचे हत्यार उपसले आहे. आमच्या मागण्या लवकरात लवकर मान्य नाही झाल्यातर आणखी उग्र आंदोलन करण्यात येईल असे उपोषण कर्त्या ग्रामस्थांनी महाराष्ट्र संदेश न्युज शी बोलताना सांगितले.