अनिल कडू प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- तालुक्यातील आजंती शिवारात एका ट्रक मध्ये राष्ट्रीय महामार्ग 44 मध्ये अवैधरित्या जनावर भरून नेत असल्याची माहिती हिंगणघाट पोलीसाना मिळाली. यावरून पो. उप.नी. रमेश कुमार मिश्रा, पोहवा नरेंद्र डहाके, प्रवीण बोधाने, पो. का.भूषण भोयर, संदीप उईके, महेंद्र गायकवाड, दीपक हाके इत्यादींनी घटनास्थळी रवाना होऊन सदर ट्रकला ताब्यात घेतले. सदर ट्रक मध्ये एकूण मशीन 16 म्हसी प्रति म्हैस 15,000 हजार रुपये ऐकून 240000 रु व ट्रक किंमत 12,00000 रू असा एकूण 1440000 रू मुद्देमाल जप्त करण्यात आला.
या प्रकरणी पोलिसांनी धडक कारवाई करत आरोपी 1) सोनाभाई शेनेमा, 2) हरेश शेंनमा दोन्ही राहणार पाटण गुजरात 3) जुनेद कुरेशी 4) मोहम्मद राहील कुरेशी 5) अब्दुल करीम कुरेशी 6) फैजान कुरेशी सर्व राहणार हिंगणघाट याना ताब्यात घेऊन त्यांचे विरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला.
सदरची कार्यवाही पोलीस अधिक्षक नुरूल हसन, अप्पर पोलीस अधिक्षक सागर कवडे, उपविभागीय पोलीस अधिकारी हिंगणघाट रोशन पंडित यांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक मारोती मुळूक पोलीस निरीक्षक हिंगणघाट याचे निर्देशा प्रमाणे पीएसआय रमेशकुमार मिश्रा, पोहवा नरेंद्र डहाके, प्रवीण बोधाने, पो. काँ. संदीप उईक, भूषण भोयर, महेंद्र गायकवाड, दीपक हाके यांनी केली.