मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन गडचिरोली:- दीक्षाभूमी देसाईगंज येथे प्रजासत्ताक दिन सोहळा उत्साहात संपन्न झाला, यावेळी सम्यक जागृत बौध्द समितीचे अध्यक्षा कविता मेश्राम यांचे हस्ते राष्ट्रीय ध्यजाचे ध्वजारोहन करण्यात आले.
गडचिरोली जिल्यातील देसाईगंज येथे सम्यक जागृत बौद्ध महिला समितीच्या सहकार्याने 75 वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला आहे. या कार्यक्रमाच्या सुरुवातीला सकाळी भगवान गौतम बुद्ध व बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून सकाळी ७.४५ वाजता समितीच्या अध्यक्षा कविता मेश्राम व सदस्या गायत्री वाहने यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर संविधानाचे प्रास्ताविक भाषण रश्मी गेडाम, घेण्यात आले. नंतर वंदना घेण्यात येऊन प्रसाद वितरण करण्यात आले.
या वेळी ममता जांबूडकर, शामला राऊत, सरिता बारसागडे, मारोती जांबूडकर, लीना पाटील, आशा रामटेके, ममता नंदेश्वर, ममता रामटेके, पवन गेडाम, नरेश वासनिक, प्रतिभा शेंडे, प्रतिभा बडोले, इत्यादी देसाईगंज येतील सम्यक जागृत बौध्द उपासक उपासिका मोठया प्रमाणात उपस्थित होते.