मुकेश चौधरी, कार्यकारी संपादक
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- स्थानिक श्री. वर्धमान स्थानकवासी श्रावक संघ, हिंगणघाट द्वारा संचालित रत्न विद्या निकेतन व बन्सीलाल कटारिया हायस्कूल, हिंगणघाट येथे प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले राजेंद्र डागा संस्थापक अध्यक्ष, लोक शिक्षण मंडळ हिंगणघाट तसेच, संस्थेचे अध्यक्ष भागचंद ओस्तवाल, उपाध्यक्ष विनय लोढा, सचिव हेमंत ओस्तवाल, सदस्य राजेश कोचर, डॉ. लोकेश ललवाणी, हेमंतजी चोरडिया, महेंद्र कासवा मंचावर उपस्थित होते.
सर्वप्रथम पाहुण्याच्या हस्ते राष्ट्रध्वज फडकावून सलामी देण्यात आली. त्यानंतर सरस्वती मातेच्या व महात्मा गांधी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले. त्यानंतर व्यासपीठावर त्यांचे पुष्पगुच्छ देवून स्वागत करण्यात आले. सर्वप्रथम शाळेतील विद्यार्थीनींनी मधुर स्वरात म्हटलेल्या ऐ मालिक तेरे बंदे हम या गीताने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. त्यानंतर लहान मुलांनी प्रजासत्ताक दिनानिमित्त भाषणे दिली.
यावेळी प्रमुख पाहुणे राजेंद्र डागा, अध्यक्ष भागचंद ओस्तवाल व सचिव हेमंत ओस्तवाल यांनी आपल्या भाषणातून प्रजासत्ताक दिना बाबत माहिती दिली, शिक्षणा बद्दल, नियमित अभ्यासा बद्दल आपले अनुभव व्यक्त करीत विद्यार्थ्या मध्ये जागृती निर्माण केली. प्रजासत्ताक दिनाचे अवचीत्य साधून विज्ञान व ऐतिहासिक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यात ईयत्ता १ ली ते ईयत्ता ४ थी पर्यतच्या विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या वैज्ञानिक प्रतिकृती ठेवण्यात आल्या होत्या. तसेच, ईयत्ता ५ वी ते ईयत्ता ९ वी पर्यतच्या विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या ऐतिहासिक प्रतिकृती ठेवण्यात आल्या होत्या. याचे निरीक्षण प्रमुख पाहुणे आणि सभासदांनी केले. या क्षणाचा उपस्थित विद्यार्थ्यांनी भरपूर आनंद घेतला.
तेव्हा शाळेतील वातावरण आनंदित व उत्साही दिसून येत होते.
या कार्यक्रमाच्या आयोजनाकरिता शाळेचे सचिव व सांस्कृतिक समिती प्रमुख हेमंत ओस्तवाल यांचे वेळोवेळी सहकार्य लाभले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षिका वैशाली चौधरी व रश्मी गहेरवार यांनी केले. यावेळी सर्व मान्यवरांनी कार्यक्रमाचे कौतुक केले. हा कार्यक्रम उत्कृष्ट प्रकारे पार पाडण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक अजयकुमार यादव, शिक्षकवृंद व कर्मचाऱ्यांचेही महत्त्वाचे योगदान होते.