उमेश इंगळे प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन अमरावती:- जिल्हातून संपूर्ण राज्याला हादरविणारी घटना समोर आली आहे. दर्यापूर तालुक्यातील रहिमापूर चिंचोली पोलीस स्टेशन हद्दीतील कुरणखेड या गावांमध्ये काही समाज कंठकानी बौद्ध समाजाच्या वस्तीवर हल्ला केल्याची घटना घडली आहे. त्यामुळे अमरावती जिल्हासह राज्यात खळबळ माजली आहे.
प्राप्त माहितीनुसार, रहिमापूर चिंचोली पोलीस स्टेशन हद्दीतील दर्यापूर तालुका आणि अमरावती जिल्ह्यामध्ये काही जातिवादी मानसिकतेच्या समाज कंठकानी संगममत करून कुरणखेड येथील बौध्द समाजाच्या वस्तीवर हल्ला करत बौध्द समाजाच्या नागरिकांना मारहाण करण्यात आली ते इतक्यावरच थांबले नाही तर या समाज कंठकानी बौध्द धर्माचा पंचशील झेंडा काढून जमिनीवर फेकून तो तोडून विटंबना केली. कुरणखेड गावात जातीय मानसिकतेमुळे बौद्ध वस्तीवर हल्ला आल्याची माहिती नागरिकांनी दिली. यावेळी महिलां आणि पुरुषांना लाट्या काट्यांनी बेदम मारहाण करण्यात आली. या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच तडका फडकी रहीमापुर पोलीस घटनस्थळी आपल्या फौज फाट्यासह दाखल झाली.
यावेळी गावातील बौध्द समाजाच्या नागरिकांनी आरोपी समाज कंठका विरोधात पोलिसांनी तात्काळ गुन्हे दाखल करण्यात यावे. पोलीस स्टेशनचे निरीक्षक यांनी आरोपी विरोधात अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत, ॲट्रॉसिटी ॲक्ट अंतर्गत गुन्हा दखल करून सर्व आरोपीना अटक करावे आणि बौद्ध वस्तीला पोलीस संरक्षण द्यावे अन्यथा या गावांमध्ये निळा उद्रेक पेटल्याशिवाय राहणार नाही असे आंबेडकरी चळवळीतील सामाजिक कार्यकर्ते यांनी सांगितले.
या प्रकरणी पुढील तपास पोलीस करत आहे. लवकरच आरोपीवर कारवाई करण्यात येणार असे सांगितले आहे. लोकांनी अफवावर विश्वास ठेऊ नये असे पोलिसांनी सांगितले.
आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 9766445348 7385445348