आशीष अंबादे, वर्धा जिला प्रतिनिधि मोबा.न.8888630841
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा:- जिल्ह्यात सर्वत्र दारूबंदी असतानाही दारूचा महापूर वाहत आहे अशी स्थिती जिल्हातील प्रत्येक तालुक्यात दिसून येत आहे. मोठ्या प्रमाणात अवैधरित्या दारुसाठी लगतच्या जिल्ह्यातून वर्धा जिल्हात पुरवठा केला जात असल्याचं समोर आलं आहे. वर्ध्याच्या सीमेलगत असलेल्या बार, वाईन शॉप या ठिकाणावरून वर्धा जिल्हात दारू पुरवठा केला जातोय. त्यामुळे दारूबंदी कायद्यावरच आघात होत असल्याचं चित्र आहे. त्याला आळा घालण्यासाठी आता वर्धा पोलीस प्रशासनाने कंबर कसली आहे.
आता थेठ अवैधरित्या दारू पुरवठा करणाऱ्या इतर जिल्ह्यातील बार मालकांचा परवाना रद्द करण्याचा प्रस्ताव वर्धा पोलीस प्रशासनाकडून राज्य उत्पादन शुल्क विभागाला पाठविण्यात आला आहे.लगतच्या जिल्ह्यांच्या सीमेवरून वर्ध्यात दारू पुरवणाऱ्या बार मालकांवर यापूर्वी कलम 82 अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहे. पण तरीही हा प्रकार थांबला नसल्याने ज्या बार मालकावर पाच पेक्षा जास्त गुन्हे दाखल आहेत त्यांचा परवानाच रद्द करण्याचा प्रस्ताव राज्य उत्पादन शुल्क विभागाकडे पाठविण्यात आला आहे. त्यामुळे लवकरच अशा बार मालकांचे परवाने रद्द होणार आहेत.