मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन अहेरी:- आशिया खंडातील सर्वात मोठी जत्रा म्हणून मेडारम येथील जत्राची ओळख आहे. दर दोन वर्षांनी याठिकाणी समक्का, सारक्का मातेच्या दर्शनासाठी भाविकांची अलोट गर्दी असते.सध्या याठिकाणी भाविकांची नेहमीप्रमाणे मोठी गर्दी होताना दिसत आहे .नुकतेच अहेरी इस्टेटचे सहावे राजे तथा माजी राज्यमंत्री अम्ब्रिशराव आत्राम यांनी माताराणी रुक्मिणीदेवी, बंधू युवा नेते अवधेशराव आत्राम असे सहपरिवार त्यांनी मातेचे दर्शन घेतले.
तेलंगाणा राज्यात मुलुगु जिल्ह्यातील ताडवाई तालुक्यातील मेडारम येथे समक्का,सारक्का मातेचे मंदिर आहे. याठिकाणी दर दोन वर्षांनी मोठी जत्रा भरते. यावेळी तेलंगाणा, आंध्रप्रदेश, महाराष्ट्र,छत्तीसगड, मध्यप्रदेशसह आदी राज्यातील भाविक याठिकाणी दर्शनासाठी मोठी गर्दी करतात. फेब्रुवारी महिन्यात एक आठवडा विशेष पूजा केली जाते. मात्र,जवळपास एक महिना अगोदर आणि एक महिनानंतरही चालणाऱ्या या जत्रेत भाविकांची गर्दी बघता प्रशासनाची मोठी तारांबळ उडते. सुरक्षेच्या दृष्टिकोनातून आणि भाविकांच्या सोई सुविधेसाठी मागील एक महिन्यापासून तेलंगाणा प्रशासन याठिकाणी कामाला लागले आहे.
फेब्रुवारी महिन्यात मोठी गर्दी होणार म्हणून राजे अम्ब्रिशराव आत्राम यांनी सहपरिवार नुकतेच मेडारम येथे दाखल होत समक्का-सारक्का माते चे दर्शन घेऊन समस्त जनतेला सुख-शांती, समाधान व उत्तम आरोग्य लाभो अशी मातेकडे प्रार्थना केले.! यावेळी अहेरी विधानसभा क्षेत्रातील भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.