अनिल कडू प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिगणघाट:- मौजा हिंगणघाट येथील स्थायी पट्ट्यावर असलेल्या प्रत्येक भूखंडाचे क्षेत्रफळानुसार संपूर्ण भूखंडधारकांचे वेगळी व स्वतंत्र आखीव पत्रिका तयार करून भूखंडाचा ऑनलाईन रेकॉर्ड तयार करून द्यावा अशा मागणीचे निवेदन भारतीय सिंधी सभा, हिंगणघाटचे अध्यक्ष किशन नेभनांनी यांच्या नेतृत्वात आज भूमी अभिलेखचे उपअधीक्षक यांना देण्यात आले.
या निवेदनातून करण्यात आलेल्या मागणी नुसार, भूमी अभिलेख कार्यालयाने स्थायी पट्ट्याने मिळालेल्या काही लोकांना त्यांची आखिव पत्रिका स्वतंत्र वेगळी करून दिलेली आहे व त्यांची आखीव पत्रिका ऑनलाईन सुद्धा झालेली आहे. परंतु अनेकांची आखीव पत्रिका वेगळी झालेली नाही. यासंदर्भात उपविभागीय अधिकारी यांनी याबाबत नझुल भूमापन क्र.4 /1 वरील भूखंडधारकांना त्यांची स्वतंत्र आखीव पत्रिका तयार करून देण्याबाबत कळविले होते. परंतु उपाधीक्षक कार्यालयाकडून अद्याप पावतो कोणतीही कारवाई केलेली नाही. यासंदर्भात आमदार समीर कुणावार यांनाही एक निवेदन देण्यात आले आहे. त्यांनीही या प्रकरणाची दखल घेत त्वरित कारवाई करण्याचे निर्देश दिलेले आहेत.
हिंगणघाट येथील ब्लॉक क्रमांक 11, शीट क्र.17, 18 वरील स्थायी पट्ट्याने प्राप्त भूखंड क्र 4 / 1 च्या जागेमध्ये प्रत्येकाने क्षेत्रफळानुसार व त्यांचे नावाने असलेल्या भूखंड धारकांना त्यांची वेगळी आखीव पत्रिका तयार करून देण्यात यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली.
यावेळी भारतीय सिंधी सभेचे आकाश बसंतानी, भाई लखीमचंद उदासी, विजय जेस्वानी, संजय खियांनी, दिलीप दुब्बानी, दिलीप रहेजा, लक्ष्मण मोटवाणी, श्याम सुखवानी, बिट्टू पाखराणी, प्रदीप बोधानी, शुभम उदासी, हरीष जेस्वानी, पवन पाखराणी, चांदीराम नैनानी, बलराम नैनानी व कार्यकर्ते उपस्थित होते.