अनिल कडू, विशेष प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- येथील महात्मा गांधी सार्वजनिक वाचनालयात हुतात्मा दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून माजी नगराध्यक्ष राजेंद्र डागा तर प्रमुख उपस्थिती ज्ञानेश्वर वाघमारे, लीना शेंडे, प्रा. अभिजित डाखोरे यांची उपस्थिती होती.
यावेळी ज्ञानेश वाघमारे यांनी गांधीजींच्या जीवनावर प्रकाश टाकीत समज गैरसमजाचे अनेक दाखले दिले. लीना शेंडे यांनी गांधीजी आणि आजची व्यवस्था यावर भाष्य करीत मनोगत व्यक्त केले. यावेळी कवी मुगल बेग यांनी कविता सादर केली. मारोतराव नोकरकर यांनी गीते सादर केली.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष राजेंद्र डागा यांनी अध्यक्षीय भाषणातून या थोर व्यक्तिमत्वाची आणि त्यांच्या विचारांची समाजाला गरज असल्याचे प्रतिपादन केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक आयोजक रमेश झाडे यांनी तर संचालन माया खुणकर आणि आभार अभिजित डाखोरे यांनी मानले.
या कार्यक्रमाला केशव तीतरे, वसंतराव कडू, वसंतराव ठोंबरे, संभाजी सोनटक्के, भीमराव बालपांडे, स्मिता काळे, गिरीश देशपांडे, शंकरराव घुमडे, विजयराव झाडे, दामोदर काळे, अक्षय हिवंज यांच्या सह विविध क्षेत्रातील मंडळी उपस्थित होती.