मुकेश चौधरी कार्यकारी संपादक
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- भारत विद्यालय हिंगणघाट येथे पर्यवेक्षिका पदावर कार्यरत असलेल्या प्रतिभा आगलावे या प्रदीर्घ काळ सेवा बजावून नुकत्याच सेवा निवृत झाल्या . या निमित्य सेवानिवृत्ती शुभेच्छा समारंभाच्या कार्यक्रमासाठी प्रोग्रेसिव्ह अेज्युकेशन सोसायटी, हिंगणघाटचे सचिव रमेश धारकर, सहसचिव संजयराव देशपांडे, कार्यकारणी सदस्य तथा माजी मुख्याध्यापक बळीराम चव्हाण, सत्कारमुर्ती प्रतिभा आगलावे, मुख्याध्यापक राजु कारवटकर, उपमुख्याध्यापक हरीश भट्टड, पर्यवेक्षक विनोद नांदुरकर आदी मंचावर उपस्थित होते.
या कार्यक्रमाच्या प्रास्ताविकातून मुख्याध्यापक राजु कारवटकर यानी पर्यवेक्षिका प्रतिभा आगलावे यांचा यांचा जीवनपट सांगितला. याप्रसंगी रमेश धारकर म्हणाले की, शाळेची शिस्त, कामातील प्रामाणिकपणा आणि विद्यार्थ्यांवर प्रेम करणाऱ्या या शिक्षिका आहेत. संस्थेत काम करणाऱ्या प्रत्येक शिक्षकानी शिक्षकी पेशा हा नौकरी न करता प्रत्येकाने व्रत म्हणून सेवा करावी. याप्रंसगी पर्यवेक्षिका आगलावे यांचा सत्कार मान्यवराच्या हस्ते करण्यात आला. यावेळी वैभव आगलावे व गौरव आगलावे आदी उपस्थित होते.
यावेळी शिक्षका प्रतिभा आगलावे यांच्या बदल संजयराव देशपांडे, बळीराम चव्हाण, निवेदिता वझलवार, विनोद वाढे, प्रंशात बाबुळकर, सुर्यभान काळे, अतुल चिलविरवार यानी मनोगत व्यक्त् केले. तर सोनाली पातोंड व पवन लोहकर यानी गीत सादर केले. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन गजानन सयाम यानी तर आभार उपमुख्याध्यापक हरीश भट्टड यानी केले.