मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन अहेरी:- अयोध्या येथील प्रभु श्रीराम मंदिरात “रामलल्ला” च्या मुर्ती प्राण-प्रतिष्ठा सोहळ्याचे औचित्य साधून अहेरी राज नगरीतील टेकडी हनुमान मंदिर कमिटी तर्फे अहेरीच्या वतीने कारसेवकांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाचं अध्यक्षस्थानी विनोद भोसले होते तर प्रमुखं उपस्थितीत व्यापारी संघटनेचे पदाधिकारी प्रमोद दोंतुलवार, विभाग सह प्रचारक सागर अहीर जिल्हाध्यक्ष आदिवासी आघाडी संदीप कोरेत विश्व हिंदू परिषद जील्हामंत्री अमीत बेझलवार तसेच व टेकडी हनुमान मंदीरकमेटीचे अध्यक्ष सर्वेश्र्वर मांडवगडे हे मंचावर उपस्थित होते.
या कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलनने झाली यावेळी उपस्थित मान्यवरांनी आपापले मत व्यक्त केले. सन 1991 व 1992 या दोन्ही वर्षी अयोध्या येथे कारसेवक म्हणून अहेरी येथून जाणाऱ्यांची संख्या जवळपास 40 च्या जवळ होती त्यापैकी हेमंत देशमुख, संतोष जोशी, मोरेश्वर नामनवार, शैलेश मद्दीवार, श्रीधर खोनरे, प्रशांत पत्तिवार, अशोक नामनवार, साईनाथ ओतकर , दिलीप गुरणुले संतोष बेझंकीवार, मनोहर बावणे, गजानन कोसरे, राजु कोसरे, प्रवीण पुल्लुरवार, रविंद्र पुल्लुरवार, मधूकर मट्टामी, प्रकाश समुद्रालवार, स्वाती उदय मद्दीवार या 18 कार सेवकांनी सत्कार सोहळा कार्यक्रमांत उपस्थीत दर्शविली.
या कारसेवका पैकी कारसेवक संतोष जोशी यांनी प्रत्यक्ष अनुभव कथन करून त्या भयावह दृष्याची आठवण करून दिली. या कार्यक्रमांत उपस्थीत मान्यवरांच्या हस्ते सगळ्यांचं सत्कार करण्यात आला त्यानंतर मान्यवर, कारसेवक कार्यक्रमाचा उपस्थीत सर्व लोकांनी भोजनाचा आस्वाद घेतला. या कार्यक्रमांचे प्रास्ताविक ऍड. यशवंत मेश्राम यांनी केले तर आभार प्रदर्शन दिनेश ठीक्रे यांनी केले.
या कार्यक्रमाचा यशवितेसाठी रोहन शुध्दलवार सचिन येरोजवार, मनोहर बावणे, श्रेयस श्रीरामवार, अनुज पांढरे, सागर शुध्दलवार, राकेश सुपटंम, योगेश तुलसिगिरी, प्रविण बावने, शैलेश मथनवार, रवींद्र मोहुर्ल, शैलेश खलिडकर, महेश मोहूर्ल, अविनाश मादासवार, मोहित सोनटक्के, वेंकटेश कोकेरवार, राजु गांटीवर, सिणू अग्गुवार, सागर दंडिकवार, रुपेश मोगलीवार, नागेश मुरमुरवार, संकेत दरगे, अक्षय दंडिकवार, मोरेश अगुवार, सुरज तुळसिगिरीवार, राहुल आत्राम, गिरिधर मेश्राम व कमिटीच्या सदस्यांनी केलें.