Sunday, February 8, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home Uncategorized

पिंपरी चिंचवड मध्ये हुंडाबळी: सासरच्या मंडळींनी केलेल्या अतोनात छळाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
February 3, 2024
in Uncategorized, क्राईम, पश्चिम महाराष्ट्र, पुणे, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
पिंपरी चिंचवड मध्ये हुंडाबळी: सासरच्या मंडळींनी केलेल्या अतोनात छळाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

बालाजी शिंदे पुणे शहर प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज !ऑनलाइन पिंपरी चिंचवड:- येथून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. आज 21 व्या शतकात असूनही हुंड्याने एका विवाहित महिलेचा जीव घेतला आहे. नवीन फ्लॅट खरेदी करण्यासाठी माहेरहुन पैसे आणाण्यासाठी विवाहितेचा मानसिक व शारीरिक छळ केला. सासरच्या छळाला कंटाळून महिलेने राहत्या घरात सिलींग फॅनला साडीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. ही घटना समोर येताच संपूर्ण शहरात खळबळ उडाली होती.

सासरच्या छळाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या केल्याच्या घटनेनंतर सांगवी पोलिसांनी पती व सासु – सासऱ्याला बेड्या ठोकल्या आहे. ही घटना गुरुवारी (दि.1 फेब्रुवारीला दुपारी 1.00 वाजताच्या सुमारास पिंपळे निलख येथील पंचशिलनगर येथे घडली. गायत्री किरण माने वय 26 वर्ष रा. मुद्रा हाईट्स असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे.

याबाबत आत्महत्या केलेल्या गायत्री यांचे वडिल खंडु उत्तम जाधव वय 49 वर्ष रा. शिवतीर्थनगर, थेरगाव यांनी सांगवी पोलीस स्टेशन येथे सासरच्या मंडळीं विरुद्ध फिर्य़ाद दिली आहे. यावरुन सासु, सासरे परशुराम दिनकर माने, पती किरण परशुराम माने, नणंद यांच्यावर आयपीसी 306, 498 (अ), 323, 34 नुसार गुन्हा दाखल करुन पती, सास- सासऱ्याला अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या 26 वर्षीय मुलीचे आरोपी किरण याच्यासोबत लग्न झाले होते. लग्नानंतर आरोपींनी संगनमत करुन गायत्री हिने नवीन फ्लॅट घेण्यासाठी माहेरहुन दोन लाख आणावेत यासाठी वारंवार शारीरिक व मानसिक छळ केला. तिच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिला अपमानित केले. तसेच तिला क्रुरपणे व हिनतेची वागणूक दिली. सासरच्या लोकांकडून होत असलेल्या छळाला कंटाळून गुरुवारी (दि.1) राहत्या घरी बेडरूममध्ये सिलिंग फॅनला साडीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. गायत्रीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करुन पती, सासु सासऱ्यांना अटक केली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक खलाटे करीत आहेत.

Tags: पिंपरी चिंचवड पोलीसपुणे जिल्हाविवाहितेची आत्महत्याहुंडा बळी
Previous Post

के.सी.सी.एल (KCCL) क्रिकेट क्लब बल्लारपुर द्वारा आयोजित टेनिस बॉल क्रिकेट टूर्नामेंट बड़े धूमधाम से संपन्न.

Next Post

वर्धा लोकसभा शिवसेना शिंदे गटाने लढवावी शिवसेनेच्या जिल्हा पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत मागणी.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
वर्धा लोकसभा शिवसेना शिंदे गटाने लढवावी शिवसेनेच्या जिल्हा पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत मागणी.

वर्धा लोकसभा शिवसेना शिंदे गटाने लढवावी शिवसेनेच्या जिल्हा पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत मागणी.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In