प्रविण जगताप, वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी
मोबा. 9284981757
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने अनुदानवर अभियांत्रिकीत शिकत असलेल्या शेतकरी मुलांना अर्ध्या अनुदानवर लॉपटॉप वितरण करण्यात आले. यावेळी हिंगणघाट कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती ऍड. सुधीर कोठारी यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
हिंगणघाट कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने मागील 12 वर्षा पासून सुरु असलेली योजना पुढील वर्षा पासून बंद करण्यात येणार असल्याचे सभापती ऍड. सुधीर कोठारी हे घोषित करणार होते. परतू काही शेतकरी पाल्यानी या योजनेबाबत आपले मनोगत व्यक्त करतांना अतिशय भावुक होऊन आमच्या घरची स्थिती लॉपटॉप घेण्याची नव्हती परंतु बाजार समितीच्या सौजण्याने अनेक गरीब विध्यार्थ्यांची अडचणी दूर केल्याची प्रांजल भावना व्यक्त केली.
यावेळी या विद्यार्थ्यांचे हे मनोगत एकूण ऍड. सुधीर कोठारी हे भावुक झाले व त्यांनी आमचे संचालक मंडळ या बाजार समितीवर कार्यरत राहील तो पर्यंत ही योजना सुरु राहणार असल्याचे टाळयांच्या कडकडात जाहीर केले.