विश्वनाथ जांभूळकर एटापल्ली तालुका प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन गडचिरोली:- 5 फेब्रुवारी रोजी एटापल्ली येथे आयोजित भाकपा च्या बैठकीत, भारतीय कम्युनिस्ट पार्टीचे तालुका सचिव कॉ. सचिन मोतकुरवार यांनी जाहीर केले की, महाविकास आघाडीच्या वतीने भाकपा अहेरी विधानसभा निवडणूक लढविणार आहे.
कॉ. मोतकुरवार म्हणाले, “आगामी विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडी एकत्रितपणे लढणार आहे आणि भाकपा अहेरी मतदारसंघातून आपला उमेदवार उभा करणार आहे. भाकपा नेहमीच गरिब, शेतकरी आणि कामगार वर्गाच्या हितासाठी लढत आली आहे आणि आम्ही या निवडणुकीतही विजयी होऊन जनतेच्या हिताचे काम करू.” भाकपा अहेरी विधानसभातील सर्व कार्यकर्ते व समर्थकांनी जोमाने कामात लागावे असे आव्हान यावेळी केले. या बैठकीत यावेळी भाकपा चे अनेक सदस्य उपस्थित होते.