प्रविण जगताप, वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी
मो . 9284981757
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा :- काल दिनांक 4 फेब्रुवारी ला दत्ता मेघे मेडिकल कॉलेज सावंगी वर्धा येथे कोचिंग क्लासेस टिचर्स फेडरेशन ऑफ महाराष्ट्र च्या राज्य कोर कमेटीची मिटींग झाली असुन ह्या मिटींग मधे राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार आणी जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्काराचे वितरण पाहुण्यांच्या शुभ हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणुन खासदार रामदास तडस, विधान परिषदचे आमदार रामदास आंबटकर आणी दत्ता मेघे मेडिकल कॉलेज चे व्यवस्थापक डाॅ. अभ्युतदादा मेघे मंचकावर हजर होते. यावेळी पंचवीस जिल्हातुन कोचिंग क्लास संघटनेचे पदाधिकारी ह्या सोहळ्यात सहभागी झाले होते.
कोचिंग क्लासेस टिचर्स फेडरेशन ॲंड सोशल फोरम ऑफ महाराष्ट्र ( सि.सि.टी.एफ एम.) या संघटनेच्या राज्यअध्यक्ष पदाचे सर्व लिगल अधिकार मला मिळाले असुन सर्व लिगल डाकुमेंट माझ्या देण्यात आले. ह्मा कार्यक्रमामधे केंद्र सरकारने कोचिंग क्लास मधे सोळा वर्षा खालील विद्यार्थींना प्रवेश नाही असा कायदा करुन कोचिंग क्लासेस वर अती जाचक अटी लावण्यास सर्व राज्यांना आदेश दिले. त्यावर संघटनेने विचार मंथन करून खासदारांना व आमदारांना येणाऱ्या कायदामधे काही प्रमाणात शितीलता आणण्यासाठी साकडे घातले. तसेच सोळा वर्षांच्या खालील विद्यार्थींना कोचिंग क्लासेस साठी घातलेल्या बंदीवर तोडगा काढण्यासाठी विनंती केली.
सि.सि.टी.एफ.एम.हि फक्त सामान्य कोचिंग क्लास संचालकांची एकमेव शिखर संघटना असुन कुठल्याही दुहेरी वाल्यांना किंवा त्यांच्या क्लास मधे दुहेरी असणाऱ्यांना सिसिटीएफएम मधे स्थान नाही. राज्यात सिसिटीएफएम हि लवकरच नंबर वन संघटना म्हणून ओळखल्या जाईल. हे मात्र नक्की.