अनिल कडू विशेष प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- साईबाबा लोकप्रबोधन कला महाविद्यालय वडनेर ता हिंगणघाट जिल्हा वर्धा द्वारा आयोजित राष्ट्रीय सेवा योजना शिबिर मौजा वेणी तालुका हिंगणघाट जिल्हा वर्धा येथे आयोजित करण्यात आले. त्या अनुषंगाने विद्यार्थ्यांना विजय धात्रक जिल्हा प्रभारी पतंजली किसान सेवा समिती वर्धा, व श्री राहुल वंजारे महामंत्री युवा भारत वर्धा द्वारे योग व प्राणायम चे मार्गदर्शन करून विद्यार्थ्यांना योग व प्राणायमचे महत्त्व समजून सांगण्यात आले व प्रात्यक्षिक घेण्यात आले.
योग व प्राणायम मुळे शरीर सुदृढ, तंदुरुस्त व निरोगी राहते तेव्हा रोज आपल्या जीवनात योग व प्राणायमचा समावेश करावा याबाबत महत्त्व पटवून देण्यात आले. यावेळी शेकडो विद्यार्थांनी यात सहभागी होऊन याचा लाभ घेतला.

